⁠ 
रविवार, नोव्हेंबर 10, 2024
Home | जळगाव जिल्हा | शेतात तृणधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकवा अन् शासनाकडून बक्षीसही मिळवा

शेतात तृणधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकवा अन् शासनाकडून बक्षीसही मिळवा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जुलै २०२३ । राज्यातील कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी विभागाने तृणधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांची स्पर्धा आयोजित केली आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगांव जिल्ह्यामधील खरीप हंगामातील पिकांसाठी ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

प्रयोगशिल शेतकऱ्यांना मार्गदर्शन, इतर शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनात वाढ करणे, शेतकऱ्यांचे मनोबल वाढविणे, पिकांच्या क्षेत्रात उत्पादन तंत्रज्ञानाचा प्रसार करणे व वाढ करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

या पीक स्पर्धेत खरीप हंगामामधील भात, ज्वारी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग सूर्यफुल या पिकांचा अंर्तभाव केला आहे. मूग व उडीद पिकांसाठी ३१ जुलै, भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी) तूर, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल या पिकासाठी ३१ ऑगस्ट अंतिम दिनांक आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पिकनिहाय प्रत्येकी ३०० रूपये फी आहे. स्वतःच्या नावावर जमिनीचा ७/१२ व ८- अ उतारा सहभागासाठी आवश्यक कागदपत्रे आहेत. आदिवासी शेतकऱ्यांकरिता जातीचा दाखला आवश्यक आहे.

तालुका पातळी प्रथम बक्षिस ५ हजार रूपये, व्दितीय- ३ हजार रूपये , तृतीय – २ हजार रूपये बक्षिस आहे. जिल्हा पातळी प्रथम बक्षिस – १० हजार रूपये, व्दितीय- ७ हजार रूपये, तृतीय – 3 हजार रूपये, राज्य पातळी प्रथम बक्षिस -५० हजार रूपये, व्दितीय- ४० हजार तृतीय –३० हजार रूपये आहे. खरीप हंगाम पीक स्पर्धेत सहभागी होणेसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयांना संपर्क साधावा. असे आवाहन श्री.वाघ यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.