शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२२ । शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमि्त शिवसेना जळगाव महानगर तर्फे अभिवादन करण्यात आले. यावेळी युवासेने तर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले, त्यात 67 बाटल्या रक्त संकलन करण्यात आले, बळीराम पेठ शाखेतर्फे प्रतिमा पूजन तर सायंकाळी शिवसेना जिल्हा कार्यालय जवळ प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी महापौर जयश्री महाजन, उप महापौर कुलभूषण पाटील, माजी महापौर नितीन लढ्ढा, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे, समन्वयक अंकुश कोळी, संतोष पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख पियूष गांधी, माजी नगरसेवक जितू मुंदडा, उप महानगर प्रमुख नितीन सपके, गणेश गायकवाड, मानसिंग सोनवणे, प्रशांत सुरळकर, डॉ जुबेर खाटीक, अल्पसंख्यांक आघडीचे जाकिर पठाण, युवासेना महानगर प्रमुख अमोल मोरे, यश सपकाळे, उप जिल्हाप्रमुख विशाल वाणी, अंकित कासार गजेंद्र कोळी, नीरज चौधरी, गिरीश कोल्हे, बाळा कंखरे, महेश ठाकूर, महीला आघाडीच्या मंगला बारी, मनीषा पाटील, नीलू इंगळे, गायत्री सोनवणे, ऍड. राजेश पावसे, पुनम राजपूत, सुनील ठाकूर, राहुल नेटलेकर, सोहम विसपुते, विपीन पवार, निभय पाटील, महेश पाटील, गौरव चदनकर, रुपेश भाकरे, दिनेश गवळीशोएब खाटीक, निखिल सोनार, भावेश ठाकूर, मयूर गवळी, शुभम निकम, पप्पू शेख, सलीम शेख, बंटी सय्यद टींकु तलरेजा, अशपाक बागवान, आबीद खान आदी उपस्थित होते.