“छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे श्वास आणि प्राण”; पालकमंत्री गुलाबराव पाटलांचे भावनिक प्रतिपादन

फेब्रुवारी 19, 2026 12:56 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ फेब्रुवारी २०२६ । “छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे श्वास आणि प्राण आहेत. शिवरायांचा इतिहास फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण विश्वासाठी प्रेरणादायी आहे,” छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा, विचारांचा आणि आदर्शांचा गौरव करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी असे भावनिक प्रतिपादन केले.

GP Shivjayanti

यांची होती उपस्थिती?

जिल्हा प्रशासन व जळगाव शहर सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकूल येथे आयोजित शिवजयंती उत्सव कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.या कार्यक्रमास वस्त्रोद्योग मंत्री तथा सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष संजय सावकारे, महापौर दिपमाला काळे, आमदार सुरेश भोळे, उपमहापौर मनोज चौधरी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जैन इरिगेशन सिस्टीम लि. चे चेअरमन अशोक जैन अपर जिल्हाधिकारी डॉ.श्रीमंत हारकर, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisements

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले,सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती, जळगाव गेल्या 26 वर्षांपासून सातत्याने आणि सर्वसमावेशक पद्धतीने शिवजयंती साजरी करत असून समाजातील सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन शिवरायांची जयंती साजरी करण्याची परंपरा जळगाव शहरात रुजवली आहे.

Advertisements

या कार्यक्रमाच्या नियोजनाचे कौतुक करत पालकमंत्री पुढे म्हणाले की, “शिवजयंती म्हणजे केवळ उत्सव नव्हे, तर एक सामाजिक एकात्मतेचा संदेश आहे. सर्व समाजघटकांना सोबत घेऊन शिवरायांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ही समिती सातत्याने करत आहे, हे खरोखरच कौतुकास्पद आहे.

छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी ठरतात, “शिवरायांचा आदर्श प्रत्येकाने आपल्या कृतीत उतरवला पाहिजे. शिवरायांचे चरित्र हे सर्वांसाठी कायम प्रेरणादायी आणि ऊर्जास्रोत राहणार आहे.” शिवजयंती महोत्सव समितीच्या उपक्रमांचे कौतुक करत पालकमंत्री यांनी आयोजकांचे अभिनंदन करून सर्व उपस्थितांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमात उपस्थित शिवभक्तांच्या ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर आधारीत जीवंत देखाव्यांच्या माध्यमातून शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत विविध शाळांचे, महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. सूत्रसंचालन सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे समन्वयक शंभू पाटील यांनी केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now