⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | सोने - चांदीचा भाव | पोस्टाची जबरदस्त योजना ; दररोज 50 रुपयांच्या बचतीत मिळेल 35 लाख रुपये

पोस्टाची जबरदस्त योजना ; दररोज 50 रुपयांच्या बचतीत मिळेल 35 लाख रुपये

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२२ । भारतीय टपाल खात्याच्या (Post Office) गुंतवणुकीसाठी अनेक योजना (Investment Plan) असून या योजनांमधील गुंतवणूक अधिक सुरक्षित असते. कारण या योजनांना सरकारचे संरक्षण (Government Security) मिळते. जर तुम्हालाही सुरक्षित गुंतवणूक करायची असेल तर पोस्ट ऑफिस योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम आहेत. यात तुम्हाला शून्य जोखमीसह चांगला परतावा मिळेल. आज आम्ही तुम्हाला ग्राम सुरक्षा योजनेबद्दल (Gram Suraksha Yojana News) सांगणार आहोत. या योजनेत दररोज अवघे 50 रुपये गुंतवल्यास तुम्हाला 35 लाख रुपयांपर्यंत परतावा मिळू शकतो. या योजनेतील गुंतवणुकीविषयी आणि परताव्याविषयी जाणून घेऊयात.

35 लाख रुपये मिळतील
पोस्ट ऑफिसच्या ‘ग्राम सुरक्षा योजना’ इंडिया पोस्टने ऑफर केलेली ही संरक्षण योजना असाच एक पर्याय आहे. ज्यामध्ये तुम्ही कमी जोखमीसह चांगला परतावा मिळवू शकता. या योजनेत तुम्हाला दरमहा १५०० रुपये जमा करावे लागतील. ही रक्कम नियमितपणे जमा केल्यास आगामी काळात तुम्हाला 31 ते 35 लाखांचा फायदा होईल.

हे आहेत गुंतवणुकीचे नियम
19 ते 55 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो.
या योजनेअंतर्गत किमान विमा रक्कम 10,000 ते 10 लाख रुपयांपर्यंत असू शकते.
या प्लॅनचे प्रीमियम पेमेंट मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक केले जाऊ शकते.
प्रीमियम भरण्यासाठी तुम्हाला 30 दिवसांचा अतिरिक्त कालावधी मिळेल.
या योजनेवर तुम्ही कर्जही घेऊ शकता.
ही योजना घेतल्यानंतर 3 वर्षांनी तुम्ही ते सरेंडरही करू शकता. परंतु या स्थितीत तुम्हाला कोणताही लाभ मिळणार नाही.

खूप फायदा होईल
समजा, एखाद्या व्यक्तीने वयाच्या 19 व्या वर्षी या योजनेत गुंतवणूक केली, तर त्याचा 55 वर्षांसाठीचा मासिक हप्ता 1515 रुपये, 58 वर्षांसाठी 1463 रुपये आणि 60 वर्षांसाठी 1411 रुपये असेल. अशा परिस्थितीत, पॉलिसी खरेदीदाराला 55 वर्षांसाठी 31.60 लाख रुपये, 58 वर्षांसाठी 33.40 लाख रुपये आणि 60 वर्षांसाठी 34.60 लाख रुपये मॅच्युरिटी लाभ मिळेल.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.