जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जानेवारी २०२५ । सध्या प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी सर्वसामान्यांना शिक्षण आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी संशोधनपर अभ्यासक्रमावर भर द्यावा. कारण आता जग तुमच्यासाठी खुले आहे. त्यामुळे वेळ वाया न घालविता संधीचे सोने करा असा कानमंत्र राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना दिला.
राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. केतकी पाटील सभागृहात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी ते बोलत होते. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात सकाळी ११.३० वा. आगमन झाले. राज्यपाल राधाकृष्णन यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर यांच्याकडून नेत्ररोग विभागातील रूग्णांची माहिती जाणून घेतली. याठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे स्वागत केले. याप्रसंगी चेअरमन डॉ. उल्हास पाटील, डॉ. सुहास बोरले, सदस्या डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील, डॉ. अनिकेत पाटील, डॉ. नि.तु. पाटील, डॉ. रेणुका पाटील आदी उपस्थित होते. यानंतर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे महाविद्यालयात स. ११.४० वा. आगमन झाल्यानंतर गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी गोदावरी फाउंडेशनचे उपाध्यक्ष सुभाष पाटील, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
डॉ. केतकी पाटील सभागृहात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे चेअरमन माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी धन्वंतरीची मुर्ती, शाल आणि संविधान दिनदर्शिका देऊन स्वागत केले. यावेळी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देत राज्यपाल राधाकृष्णन यांनी त्यांच्याशी संवाद साधला. राज्यपाल राधाकृष्णन पुढे म्हणाले की, माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी वैद्यकीय महाविद्यालयासह अनेक शैक्षणिक संस्था उभारून भविष्यातील नेतृत्व घडविण्याचे कार्य केले आहे. देश आणि राज्यातील सरकारने आता दुर्गम भागातही शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच नवीन शैक्षणिक धोरण देखिल आता अंमलात येत असल्याने विद्यार्थ्यांने अनेक संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या संधीचे सोने करावे असा कानमंत्रही राज्यपाल राधाकृष्णन यांनी यावेळी दिला.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाला गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील,डॉ. सुहास बोरले, सदस्य डॉ. केतकी पाटील, हृदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील, डॉ. अनिकेत पाटील, डॉ उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाचे संचालक डॉ एन. एस. आर्विकर, डॉ. माया आर्विकर, डीन डॉ. प्रशांत सोळंके, गोदावरी आयएमआरचे संचालक डॉ. प्रशांत वारके, रजीस्ट्रार प्रमोद भिरुड, आयुर्वेद महाविद्यालयाचे डीन डॉ. हर्षल बोरोले, होमिओपॅथी महाविद्यालयाचे डीन डॉ.आर के मिश्रा, डॉ. डी. बी. पाटील , फिजीओथेरेपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर, गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विशाखा गणवीर, डॉ. केतकी पाटील नर्सिंग महाविद्यालयाचे संचालक शिवानंद बिरादर, गोदावरी अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. व्हि. एच. पाटील, कृषी महाविद्यालयाचे संचालक डॉ. एस. एम. पाटील, प्राचार्य डॉ. अशोक चौधरी, डॉ. शैलेश तायडे, डॉ. पूनमचंद सपकाळे, इंग्लिश मिडीयम स्कुलच्या प्राचार्या निलीमा चौधरी, अनघा पाटील, भारती महाजन, रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, प्रशासन अधिकारी आशिष भिरूड जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पो.अधिक्षक डॉ महेश्वर रेडडी,तहसिलदार शितल राजपूत प्रा. देवेंद्र मराठे, गोदावरी नर्सिंग महाविद्यालय प्रशासन अधिकारी प्रविण कोल्हे,संकेत पाटील आदी उपस्थित होते.