---Advertisement---
सरकारी योजना वाणिज्य

नवीन विहीर, बोअरवेलसाठी 50000 रुपये अनुदान मिळणार ; राज्य सरकारच्या ‘या’ योजनेच्या अटी जाणून घ्या..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मार्च २०२५ । केंद्रासह राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जात आहे. यातच शेतीतील सिंचन क्षमता वाढवण्यासाठी ज्य सरकारने अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (Birsa Munda Agricultural Revolution Scheme) राबवली आहे.

borewells

या योजनेतून शेतकऱ्यांना नवीन विहीर, बोअरिंग, शेततळ्यांसाठी प्लास्टिक पन्नी, सिंचन, विहीर दुरुस्ती आणि बोअरलवेल बसवण्यासाठी ५० हजार रुपये अनुदान दिले जाते. यामधून त्यांचे चांगले पीक यावे या उद्देशातून हे अनुदान दिले जाते. या योजनेचा लाभ अनुसूचित जमतीतील लोकांनी घ्यायचा आहे.

---Advertisement---

अटी काय?
या योजनेसाठी अर्ज करणारा शेतकरी महाराष्ट्राचा असावा.
शेतकरी अनुसूचित जमातीतील असावा. उमेदवाराकडे स्वतः चा दाखला असावा.
याचसोबत अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न दीड लाखांपेक्षा कमी असावे. त्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखलादेखील असावा.
याचसोबत या शेतकऱ्याच्या नावावार जमिनीचा सातबारा असायला हवा. अर्जदाराकडे ०.४० हेक्टर जमीन असणे गरजेचे आहे.

कागदपत्रे
आधारकार्ड, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, शेतीचा सातबारा, स्टॅम्प पेपवर प्रतिज्ञापत्र, शेती असल्याचा दाखला, शेतात कोणतीही विहीर नसल्याचा पुरावा, जागेचा फाटो, ग्रामसभेचा ठराव ही कागदपत्रे आवश्यक आहेत. याबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

अर्ज कुठे अन् कसा करायचा?
तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी या वेबसाइटवर जायचे आहे. तिथे शेतकरी योजना हा ऑप्शन निवडायचा आहे. यानंतर तुम्हाला बिरसा मुंडा कषी क्रांती योजना हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा अन् अर्ज भरा.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment