---Advertisement---
जळगाव शहर

खुशखबर! जळगाव शहरातील ई-बसच्या प्रस्तावाला शासनाची मंजुरी, ‘या’ मार्गावर धावणार?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑक्टोबर २०२३ । केंद्राच्या पी.एम. ई-बस सेवा योजनेंतर्गत देशातील ३ लाख व त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या १६९ व राज्यातील २३ शहरांमध्ये इ-बस सेवा सुरु केली जाणार आहे. त्यात जळगाव शहराचा समावेश असून महापालिकेने शहरात २५ किलोमीटरपर्यंत ई-बस सेवा सुरु करण्याबाबत प्रस्ताव पाठविला होता. अखेर राज्य शासनाने जळगावात ईबस सेवेला मंजुरी दिली आहे. मनपाच्या मालकीच्या शिवाजी उद्यानातील टी. बी. रुग्णालयाच्या जागेतून या बसेस सुटणार आहेत. तेथेच चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे.

e bus jpg webp

गेल्या बारा वर्षांपूर्वी जळगाव शहरात बससेवा सुरु होती. परंतु मनपा आणि अभिकर्ता यांच्यातील वादामुळे ही सेवा बंद पडली होती. परिणामी नागरिकांना रिक्षाचा वापर करावा लागत होता. रिक्षाचालकांकडून भाड्याची अवाजवी मागणी हा वादाचा मुद्दा ठरला आहे. दरम्यान, पीएम-ई बससेवेमुळे शहरातील नागरीकांची गैरसोय दूर होणार आहे. गेल्या आठवड्यात मनपा उपायुक्त गणेश चाटे यांनी राज्य शासनाला प्रस्ताव दिला होता. तो अखेर मंजूर झाला असून शहर बससेवेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

---Advertisement---

दरम्यान, जुने बस स्थानकाची जागा देण्यास परिवहन विभागाने नकार दिल्याने महापालिकेने स्वत:च्याच जागेत चार्जिंग स्टेशन व बस स्थानक तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

२५ किमी अंतरात १८ मार्ग
केंद्र शासनाच्या पी.एम. ई-बस सेवा योजनेंतर्गत शहर व परिसरात २५ 1 किलोमीटर अंतरावर १८ मार्गावर ही बस धावणार आहे. त्याचा कृती आराखडा महापालिकेने तयार केला होता. जुन्या बसस्थानकापासून या बसेस सुटण्याचा प्रस्ताव होता, मात्र तो आता रद्द करण्यात आला आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, पाळधी, गोदावरी वैद्यकीय महाविद्यालय, वावळदा, उमाळा, कानळदा, विदगाव, आसोदा, भादली, हरिविठ्ठल नगर, मोहाडी, धानोरा, हुडको, पिंप्राळा, संभाजी नगर, एकनाथ नगर, निमखेडी, गाडगेबाबा चौक, शिवधाम मंदिर, शिरसोली व रेल्वे स्टेशन, मनपा भवन असा चक्री मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---