---Advertisement---
जळगाव शहर जळगाव जिल्हा

खुशखबर ! जळगाव शहरातील हे १७ मुख्य रस्ते होणार चकाचक

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जानेवारी २०२२।जळगाव शहरातील १७ रस्त्यांसाठी महानगरपालिकेने न हरकत परवानगी दिली आहे. यामुळे जळगाव शहरातले तब्बल १७ रस्ते लवकरच चकाचक होणार आहेत. अमृत योजना या परिसरामध्ये आटोपल्याचा दावा पालिकेने केला आहे. यामुळे मक्तेदाराकडून तातडीने काम सुरू करण्याचे आव्हान सार्वजनिक बांधकाम विभागासमोर आहे.

Jalgaon raod jpg webp webp

शहरात रस्त्यांवरून महानगरपालिका प्रशासन टार्गेट होत आहे नागरिक मोठ्या प्रमाणावर महानगरपालिका प्रशासनावर रोश व्यक्त करत आहेत मंजूर झाल्याचे काम वारंवार सांगितले जात आहे. मात्र काम होत नाहीत यामुळे नागरिकांना खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे. अशा वेळी नागरिक महानगरपालिकेवर रोष व्यक्त करत आहेत.मात्र या सगळ्यांमध्ये आता महानगरपालिकेने न हरकत प्रमाणपत्र दिल्यामुळे लवकरच १७ रस्त्यांची काम मार्गी लागणार असून जळगाव शहरातील वीस रस्ते चकाचक होणार आहेत.

---Advertisement---

या रस्त्यांना मिळाली मंजुरी

बोहरा बाजार ते रथ चौक ते आंबेडकर नगर ते भाग्यलक्ष्मी नगर पर्यंतचा रस्ता
बळीराम पेठ, शिवाजी चौक ते मुंब्राबाद रोड पर्यंतचा रस्ता
चित्रा चौक ते मुंबई हार्डवेअर रस्ता
चौबे शाळा ते सुभाष चौक ते पुष्पलता बेंडाळे चौक पर्यंत रस्ता
प्रकाश मेडिकल ते कोंबडी बाजार चौक रस्ता
सुभाष चौक ते आर.एल शोरम रस्ता
हॉटेल टुरिस्ट ते जी एस ग्राऊंड पद्मालय रेस्ट हाऊस समोरील रस्ता
भोईटे रेल्वे गेट ते महेश प्रगती हॉल रस्ता
महेश प्रगती होल ते सेवा मंडळ सिंधी कॉलोनीचा रस्ता
एस.एम.आय.टी कॉलेज कंपाउंड ते यश लॉन रस्ता
भोईटे रेल्वे गेट ते सोमानी मार्केट रस्ता
बजरंग बोगदा ते सुरत रेल्वे गेट रस्ता
काव्य रत्नावली चौक ते महाबळ चौक रस्ता
महाबळ चौक ते देवेंद्र नगर रस्ता
डी मार्ट ते काव्यरत्नावली चौक रस्ता
सारा हॉस्पिटल ते संतोषी माता मंदिर रस्ता

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---