महावितरण कर्मचाऱ्यांचे अच्छे दिन, नववर्षात मिळाला ४० हजारापर्यंतचा फरक
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जानेवारी २०२२ । महावितरणकडून सहा महिन्यांच्या पगारवाढीतील फरकातील रकमेच्या रूपाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हातात सुमारे १ लाखापर्यंत तर अभियंत्यांना ६० ते ७० हजार, तृतीय-चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना साधारणपणे ३० ते ४० हजारांपर्यंतची गंगाजळी हातात पडली आहे.
नववर्षात एकरकमी रक्कम मिळाली आहे. दिवाळीनंतर वर्षाच्या सुरुवातीलाच ही वाढ मिळाल्याने बाजारपेठेत खरेदीची रेलचेल वाढणार आहे. सप्टेंबर २०१९मध्ये पगारवाढीचा करार झाला होता. यानंतर पहिला व दुसरा हफ्ता प्रशासनाने अदा केला होता. मात्र, मध्यंतरीच्या काळात कोरोनासह मोठ्या प्रमाणात थकबाकी वसुलीअभावी महावितरणची आर्थिक कोंडीत होते. यामुळे तिसरा हफ्ता रखडला होता. मात्र, कर्मचारी संघटनांचे दोन महिन्यांपासून विविध प्रकारचे आंदोलन सुरू होते. याची दखल घेत महावितरण प्रशासनाने या फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात अदा केली असल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली.
काम करण्याची स्फूर्ती वाढली फरकाची रक्कम मिळत नसल्याने वर्कर्स फेडरेशनने यासाठी आंदोलन करीत पाठपुरावा सुरू ठेवला होता. याची दखल घेत प्रशासनाने हा निर्णय घेतला, यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहेे . वीरेंद्र पाटील, विभागीय सचिव वर्कर्स फेडरेशन ४०० अभियंत्यांसह अन्य कर्मचाऱ्यांना लाभ आंदोलनानंतर व्यवस्थापन व कर्मचारी संघटना प्रतिनिधींमध्ये झालेल्या चर्चेनंतर १ एप्रिल २०१९ ते ३० सप्टेंबर २०२१ या दरम्यान फरकाची रक्कम देण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाने दिले होते. या आश्वासनानुसार गुरुवारी ही रक्कम देण्याचा निर्णय झाला. याचा परिमंडळातील ४०० अभियंता, तांत्रिक व कार्यालयीन कर्मचारी ४००, वर्ग तीन व चार ४००० अशा ५२०० कर्मचाऱ्यांना याचा लाभ झाला आहे.
हे देखील वाचा :
- जळगावात नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या दोन युवकांवर गुन्हा दाखल
- जळगावात चाकूचा धाक दाखवून वाइन शॉप चालकाला मागितली खंडणी; गुन्हा दाखल
- जळगावात ढगाळ वातावरणासह गारठा कायम; आगामी दिवस वातावरण कसे राहणार?
- सर्वसामान्यांना झटका! जळगावात सोयाबीन तेलाचा भाव पुन्हा वाढला
- Gold Rate : मकर संक्रांतच्या दिवशी सोने महाग, जळगावच्या सुवर्णपेठेत काय आहेत भाव?