जळगाव लाईव्ह न्यूज । ०९ मे २०२१ । गेल्या काही दिवसापासून सोने-चांदीच्या भावात चढ उतार दिसून येत आहे. आज (०९ मे) सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. जळगावच्या सुवर्णनगरीत आज सोन प्रति १० ग्रॅम ११० रुपयाने महाग झाले आहे. तर चांदी प्रतिकिलो तब्बल २५०० रुपयांनी महागली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या ‘ब्रेक द चेन’ दरम्यान सुवर्ण बाजार बंद असला तरी मल्टी कमोडिटी एक्सचेंज सुरूच असल्याने सोने-चांदीत गुंतवणूक वाढत आहे. त्यामुळे या मौल्यवान धातूंचे दर वाढत आहे.
आजचा सोन्याचा भाव
२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ११ रुपयांनी वाढून ४,८०२ रुपये झाला आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४८,०२० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम भाव ४,५७३ रुपये इतका आहे. त्यात प्रति ग्रम १० रुपयांची वाढ झाली असून १० ग्रामसाठी तुम्हाला ४५,७३० रुपये मोजावे लागतील.
चांदीचा भाव
आज चांदीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. आज (०९ मे) चांदीच्या दरात २५०० रुपयांची वाढ झाली असून १ ग्राम चांदीचा भाव आज ७६.५ रुपये इतका असून १ किलोचा दर ७६,५०० रुपये इतका आहे.
दरम्यान, कोरोनामुळे जगभर अनिश्चिततेचे वातावरण आहे. त्यामुळे गुंतवणूकदार तेथून गुंतवणूक काढून सोनेखरेदीवर भर देत आहेत. त्यामुळे सोन्याचा भाव वाढण्याची शक्यता आहे.