जळगाव लाईव्ह न्यूज । २ मे २०२५ । एप्रिल महिन्यात सोन्याच्या किमतीने एक लाखाचा टप्पा गाठला असून आता मे महिन्यात सोन्याचे भाव कसे राहणार याकडे ग्राहकांचे लक्ष लागून आहे. अशात अक्षय्य तृतीयाच्या सलग तिसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे सोनं-चांदी खरेदी करण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे.

काय आहे आजचा भाव?
गुडरिटर्न्स या वेबसाईटनुसार आज २ मे २०२५ रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर २२ रुपयांनी कमी झाला आणि तो प्रति ग्रॅम ९,५१० रुपयांवर आला आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर आता ८,७५५ रुपये प्रति ग्रॅम झाला आहे जो मागील दिवसापेक्षा २० रुपयांनी कमी आहे. १८ कॅरेट सोन्याचा दर १६ रुपयांनी कमी झाला आहे. १८ कॅरेट सोन्यासाठी ७,१६४ रुपये प्रति ग्रॅम मोजावे लागतील.
तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ९५,५१० रुपये, २२ कॅरेट सोन्याची किंमत ८७,५५० रुपये आणि १८ कॅरेट सोन्याची किंमत ७१,६४० रुपये आहे. मागील दिवसाच्या तुलनेत प्रत्येक कॅरेट सोन्याच्या दरामध्ये काही प्रमाणात घसरण झाली आहे.सोन्याचे दर जरी कमी झाले असले तरी देखील चांदीचे दर मात्र स्थिर राहिले आहेत.
आज २ मे रोजी भारतात १ किलो चांदीचा भाव ९८,००० रुपये आहे. ज्यामध्ये कालच्या दिवसापेक्षा कोणताही बदल झाला नाही.