---Advertisement---
जळगाव जिल्हा वाणिज्य

Gold Silver Today : जळगावच्या सुवर्णनगरीत चांदी २००० स्वस्त, सोन्याचा भावही घसरला..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ एप्रिल २०२५ । अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संपूर्ण जगावर टॅरिफ लावण्याची घोषणा केल्यांनतर सोने दरात मोठी उसळी दिसून आली. जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे दर आजपर्यंतच्या विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. यामुळे मध्यमवर्ग चिंतेत असून लोकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. दरम्यान मागील काही दिवसापासून सुरु असलेल्या सोने दरवाढीला अखेर गुरुवारी ब्रेक लागला.

gold silver jpg webp

जळगावच्या सुवर्णगरीत सोने गुरुवारी सोने दरात ३०० रुपये प्रति तोळा घसरण झाली. दुसरीकडे चांदी दरात देखील मोठी घसरण झाली. चांदीचा दर तब्बल २००० रुपयांनी घसरला आहे. यामुळे चांदीचा भाव १ लाख रुपयाच्या खाली आहे.

---Advertisement---

काय आहे आजचे भाव?
गुरुवारी झालेल्या घसरणी नंतर आज शुक्रवारी सकाळच्या सत्रात २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८३,७८६ रुपये इतका आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९१४०० रुपये इतका असून जीएसटीसह हा दर ९४,१४२ रुपये इतका आहे. सोबतच चांदीचा दर २००० रुपयांनी घसरून प्रति किलो ९९,००० रुपयावर पोहोचला आहे.

सोन्याचा दर घसरणार?
गेल्या तीन महिन्यात सोन्याची किंमत जवळजवळ २० टक्क्यांनी वाढली आहे. गुंतवणूकदारांना खूप फायदा झाला आहे. आता काही जाणकार लोक सांगत आहेत की सोन्याच्या दरात मोठी घट होऊ शकते. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. काहींचे तर असेही म्हणणे आहे की सोन्याच्या दर ३८% पर्यंत घट होऊ शकते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment