⁠ 
बुधवार, जानेवारी 8, 2025
Home | जळगाव जिल्हा | आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचे दर वाढले की घटले? खरेदीला जाण्यापूर्वी जाणून घ्या..

आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचे दर वाढले की घटले? खरेदीला जाण्यापूर्वी जाणून घ्या..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०६ जानेवारी २०२५ । नवीन वर्ष २०२५चा पहिला आठवडा संपला असून मागील २०२४ या वर्षात सोने आणि चांदीच्या दरात बरेच चढ उतार पाहायला मिळाले. गेल्या वर्षी सोन्याची किंमत ८१ हजारांवर उसळली तर चांदीने देखील एक लाख पार मजल गाठली होती. आता नवीन वर्षात सोन्याचा भाव ९०,००० रुपयांवर झेप घेण्याची शक्यता आहे. Gold Silver Rate Today

दरम्यान, प्रत्येक दिवशी सोन्याच्या भावात उलथापालथ होत असते. कधी सोन्याचे गगनाला भिडतात, तर काही वेळा सोन्याच्या दरात अनेक वेळा घटही होत असते. मात्र आजच्या दिवशी सोन्याच्या भावात कोणतेही बदल झालेले नाहीत.

Goodreturns वेबसाईटनुसार, सोमवारी म्हणजेच आज ६ जानेवारी रोजी सोन्याचे दर स्थिर आहेत. 24 कॅरेट सोन्याचा दर 78,860 रूपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 7,88,600 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 72,300 रुपये इतका आहे.
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
१० ग्रॅम सोन्याचा भाव आज 78,860 रुपये इतका आहे.
१ ग्रॅम सोनं 7,886 रुपयांनी विकलं जात आहे.

जळगावातील भाव?
जळगाव च्या सराफ बाजारात सोन्याचा भाव विनाजीएसटी ७८,७१० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. तर चांदीचा दर ८९,५०० रुपये प्रति किलो इतका आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.