जळगाव लाईव्ह न्यूज । २ जानेवारी २०२५ । 2024 या वर्षात मौल्यवान धातू सोन्याने ग्राहकांचा खिसा चांगलाच खाली केला. आता या नवीन वर्षात ग्राहक सोनं थोडा तरी दिलासा देईल, या प्रतिक्षेत आहेत. दरम्यान, नव्या वर्षाच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याचा तोरा वाढला आहे. Gold Silver Rate Today 2 January 2025
Goodreturns वेबसाईटनुसार, गुरुवारी म्हणजेच आज २ जानेवारी रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. सोन्याच्या दरात किंचित १०० रुपयापर्यंतची वाढ दिसून आहे. दुसरीकडे चांदीचा दर स्थिर असल्याचं दिसून आले.
सध्या देशभरात लग्नाची धामधूम असून या दिवसात सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. आजच्या दिवशी जर तुम्ही सोन्याची खरेदी करण्याचा विचार करणार असाल तर सराफ बाजारातील भाव तपासून घ्या..
२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,166 रुपयांना विकलं जात आहे.
२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 57,328 रुपयांवर आहे.
१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 71,660 रुपये इतका आहे.
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
२४ कॅरेट १० ग्रॅम सोनं 78,150 रुपये किंमतीने विकलं जातंय.
८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 62,528 रुपये इतका आहे.
१ ग्रॅम सोनं 7,816 रुपयांनी विकलं जात आहे.
दुसरीकडे, चांदीमध्ये 30 डिसेंबरपासून कोणताच बदल दिसून आला नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 90,500 रुपये इतका आहे.दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.