---Advertisement---
जळगाव जिल्हा वाणिज्य

Gold Silver : सोने-चांदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर, किमती पोहोचल्या ऐतिहासिक उच्चांकांवर

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मार्च २०२५ । एकीकडे लग्नसराईचे दिवस सुरु असताना त्यातच मौल्यवान दागिन्यांचे दर गगनाला भिडले आहे. सोन्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जळगावच्या सुवर्णपेठेत या आठवड्याच्या सलग दुसऱ्या दिवशी सोने दरात वाढ झाली. सोबतच चांदीचा दर देखील महागला आहे. यामुळे आता सोने चांदी खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेले आहे. तुम्हीही आज सोने चांदी खरेदीला जाणार असाल तर त्यापूर्वी दर तपासून जा..

GS19 March

जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट सोन्याच्या किमती २०० रुपयांनी वाढून विनाजीएसटी ८८,८०० (जीएसटी ९१,४६४) रुपये प्रति १० ग्रॅम या विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या. दुसरीकडे चांदीची चकाकीही वाढली असून तिचा भाव देखील प्रति किलो १,०२,५०० रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकांवर पोहोचला आहे. काल चांदी दरात १००० रुपयाची वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात सोने १३०० रुपयांनी महागले होते. तर या सोमवारी आणि मंगळवारी सोने प्रत्येकी २०० रुपयांनी महागले.

---Advertisement---

दरवाढीचे कारण
मध्य पूर्वेतील वाढता तणाव आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांच्या आर्थिक परिणामांबद्दलची अनिश्चितता यामुळे सोन्याची ‘सुरक्षित गुंतवणूक’ प्रतिमा आणखी मजबूत झाली आहे. यामुळे सोने आणि चांदीत दरवाढ सुरूच आहे. १ मार्च रोजी जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचा दर ८५५०० रुपयावर होते.तर चांदीचा दर ९६००० रुपयावर होता. गेल्या १८ दिवसात सोने दरात ३३०० रुपयाची वाढ झाली आहे. तर चांदी दर ६००० ते ६५०० रुपयांनी वाढले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment