जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२५ । आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे सोने आणि चांदी दराने मोठी झेप घेतली आहे. सोन्याच्या दरवाढीचे नवनवीन उच्चांक प्रस्थापित केला आहे. गेल्या आठवड्यात स्थिर असलेले चांदीचे दर दहा दिवसांनी शुक्रवारी एक हजाराने वाढून प्रती किलो चांदीचे दर एक लाखांवर पोहोचले. या पूर्वी गेल्या वर्षी ३० ऑक्टोबरमध्ये १ लाख रुपये किलो (जीएसटीसह १०३०००) या उच्चांकी दराला मागे टाकले.

आंतरराष्ट्रीय सोने आणि चांदी बाजाराच्या गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी चांदीच्या दरात मोठी तेजी आली. दोन हजारांनी चांदी महाग होत १,०१,००० रुपये (जीएसटीसह १,०४,०३०) किलोवर पोहोचली. या पूर्वीचा उच्चांक मोडत चांदी सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली आहे.
जगभरातील देशाकडून पत सुधारणा करण्यासाठी सोन्याची खरेदी वाढवली आहे. त्यासोबतच औद्योगिक कारणांसाठी लागणाऱ्या चांदीचीही मागणी वाढवल्याने मागणीच्या तुलनेत पुरवठा नसल्याने दरवाढ होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. गुरुवारी चांदीचे प्रति किलोचे दर ९९ हजार रुपये होते. ते शुक्रवारी २ हजाराने वाढवून १,०१,००० रुपये हेच दर शनिवारीही कायम राहिले.