---Advertisement---
जळगाव जिल्हा बातम्या वाणिज्य

Gold Silver Rate : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्याचा दर घसरला ; पण..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जानेवारी २०२५ । वर्ष २०२४ मध्ये सोने आणि चांदीच्या किमतींनी ग्राहकांना आस्मान दाखविले आहे. गेल्या वर्षात सोन्याने ६३,८०० रुपये प्रति १० ग्रॅम या सुरुवातीच्या किमतीतून थेट ८१००० रुपये प्रति १० ग्रॅम पर्यंत पोहोचले, तर चांदीनेही १ लाख रुपये प्रति किलोचा टप्पा ओलांडला होता. मात्र, यावर्षी तरी भाव खाली येतील, अशी आशा आता ग्राहकांना लागली आहे. Gold Silver Rate Today 1 January

GS1 January

दरम्यान अशातच नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना थोडासा दिलासा देणारी बातमी समोर आलीय. ३१ डिसेंबर २०२४ रोजी, सोने आणि चांदीला मोठी पडझड झाली, ज्यामुळे ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला. जळगावच्या सुवर्णपेठेत ३१ डिसेंबर रोजी सोन्याच्या किमतीत ४०० रुपयापर्यंतची घसरण झाली यामुळे आज १ जानेवारीच्या सकाळच्या सत्रात २४ कॅरेट सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव (विनाजीएसटी) ७६,८०० रुपये पर्यंत पोहोचला आहे. तर चांदी दरात १००० रुपयापर्यंतची घसरण झाली. यामुळे आज सकाळी चांदीचा एक किलोचा दर ८८,००० रुपयांवर पोहोचला.

---Advertisement---

मात्र या नवीन वर्षात सोन्याची लकाकी वाढणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.नवीन वर्षात सोन्याचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. देशांतर्गत सोन्याचा भाव ८५ ते ९० हजार रुपयांपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे. भौगोलिक राजकीय तणाव कायम राहिला किंवा वाढला, तर चांदीच्या किमती किरकोळ वाढीसह एक ते दीड लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतात.मध्यवर्ती बँकांच्या निर्णयाचा सराफा बाजाराच्या घडामोडींवर परिणाम होईल.

जळगाव वर्षभरात सोने किती रुपयांनी वाढले?
१ जानेवारी २०२४ रोजी जळगावच्या सुवर्णपेठेत २४ कॅरेट सोन्याचा ६३,८०० रुपये प्रति १० ग्रॅम इतका होता. तर डिसेंबर अखेर तो ७६,८०० पर्यंत पोहोचला. म्हणजेच वर्षभरात सोन्याचा दर तब्बल १३००० हजार रुपयांनी वाढलेले दिसून येत आहे. तसेच चांदीचा दरही गेल्या वर्षभरात १३ ते १४ हजार रुपयांनी वाढला आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---