जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२५ । गेल्या आठवड्यात सोन्यासह चांदी दरात घसरण झाल्याने ग्राहकांना काहीसा मिळाला.मात्र या आठवड्यात सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदी दरात मोठी वाढ झाली. जळगाव सराफा बाजारात एकाच दिवसात सोने दरात तोळ्यामागे १२०० रुपयांनी वाढ झाली. तर चांदी दर १००० रुपयांनी वाढला आहे. Gold Rate Today

काय आहे आज भाव?
जळगावात सोमवारी २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅममागे ८५,७०० (जीएसटीसह ८८२७१ रुपये) होता. मंगळवारी सोने १२०० रुपयांनी महागून सोने दर ८६,९०० रु. (जीएसटीसह ८९,५०७) रुपयांवर गेले. चांदीही एक हजार रुपये महागली असून ९७,००० रुपये किलो झाली आहे. २२ कॅरेट सोने दर ७९, ६६१ रुपये (१० ग्रॅम) वर गेले आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींमुळे देशांतर्गत सोन्याच्या भावात निरंतर वाढ होत आहे. जळगावच्या सराफ बाजारात गेल्या आठवड्यात सोने दरात मोठी घसरण दिसून आलीय. या दरम्यान सोने दरात १५०० रुपयाची घसरण दिसून आलीय. तर चांदी दरात २००० रुपयांची घसरण झालेली दिसून आली. मात्र या आठवड्यात वाढ होताना दिसत आहे.