Gold Rate : मकर संक्रांतच्या दिवशी सोने महाग, जळगावच्या सुवर्णपेठेत काय आहेत भाव?
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जानेवारी २०२५ । एकीकडे शेअर बाजारात (Share Market) मोठी पडझड दिसून येत असून यातच दुसरीकडे मौल्यवान धातुने जोरदार मुसंडी मारली. गेल्या काही दिवसापासून सोने (Gold Rate) दरात होणारी दरवाढ सुरूच आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सोने दरात वाढ नोंदविली. यामुळे आज मकर संक्रांतीलाच (Makar Sankrant) ग्राहकांच्या खिशावर या दरवाढीमुळे संक्रांत आली. Gold Silver Rate Today
जळगावच्या सुवर्णपेठेत काय आहेत भाव?
जळगावच्या सुवर्णपेठ बाजारात सोमवारी सोने दरात २०० रुपयांची वाढ दिसून आली. यामुळे आज मंगळवारी सकाळच्या सत्रात २२ कॅरेट सोन्याचा दर ७२,२३६ रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा दर (विनाजीएसटी) ७८,८०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले आहे. जीएसटीसह २४ कॅरेट सोन्याचा भाव ८१,२०० रुपयावर पोहोचले आहे. दुसरीकडे चांदीचा दर ९३,००० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.
गेल्या वर्षाच्या अखेरीस सोन्याचा भाव विनाजीएसटी ८२ हजार रुपयांवर पोहोचला होता. यामुळे नवीन वर्षात तरी सोन्याचे दर कमी होतील अशी अपेक्षा ग्राहकांना होती.परंतु नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच सोन्याचे दर वाढताना दिसत आहे. जळगावच्या सराफ बाजारात गेल्या आठवड्यात सोने दरात प्रति तोळा ११०० ते १२०० रुपयापर्यंत वाढ झाली.
ऐन लग्नसराईत सोने महाग, ग्राहकांना झटका
लग्नसराईची धामधूम सुरू असताना, सोन्याच्या दरात होणारी वाढ ग्राहकांसाठी मोठी चिंता निर्माण करत आहे. लग्नाच्या खरेदीसाठी सोने हा एक महत्त्वाचा भाग असतो आणि आता महाग झाल्याने ग्राहकांची परिस्थिती कठीण झाली आहे.
सोन्याचा दर नवीन उच्चांक गाठणार
तज्ज्ञांच्या मते, 2025 मध्ये सोन्याचे भाव नवीन उंची गाठू शकतात. देशांतर्गत बाजारात सोन्याचा भाव 85,000 ते 90,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जागतिक आणि स्थानिक आर्थिक घडामोडींमुळे सोन्याच्या दरात ही वाढ होण्याची शक्यता आहे.