⁠ 
शनिवार, जानेवारी 11, 2025
Home | जळगाव जिल्हा | ग्राहकांचे दिवाळ निघणार! जळगाव सुवर्णपेठेत सलग चौथ्या दिवशी सोने महागले, चांदीही वधारली

ग्राहकांचे दिवाळ निघणार! जळगाव सुवर्णपेठेत सलग चौथ्या दिवशी सोने महागले, चांदीही वधारली

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जानेवारी २०२५ । नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सोन्याच्या (Gold Rate) किमतीने दरवाढीचा धडाका सुरूच आहे. यामुळे पुन्हा एकदा सोन्याचा दर उच्चांकीच्या दिशेने जाताना दिसत आहे. सोन्यासह चांदीचा (Silver Rate) दर देखील वाढताना दिसत असून यामुळे ऐन लग्नसराईत ग्राहकांना मोठा दरवाढीचा आर्थिक फटका बसणार आहे. Gold Silver Rate Today

जळगावात (Jalgaon) सुवर्णपेठेत सोने दरात सलग चौथ्या दिवशी दरवाढ झाली. याचबरोबर चांदी दरात देखील मोठी वाढ झालीय. शुक्रवारी सोने दरात ४०० रुपयाची वाढ झाली. यामुळे आज शनिवारी सकाळच्या सत्रात २४ कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी ७८,४०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले आहे. तसेच चांदी दरात एक हजार रुपयांची वाढ आल्याने एक किलोचा चांदीचा दर विनाजीएसटी ९२००० रुपयावर पोहोचली.

जळगावात या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचा दर ७७,५०० रुपये प्रति तोळा इतका तर चांदी ९० हजार रुपयावर होती. मात्र गेल्या चार दिवसात दोन्ही धातूंच्या किमतीत मोठी वाढ झाली. गेल्या चार दिवसात सोने ९०० रुपये तर चांदी २००० रुपयांनी वाढली. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात होणारी वाढ आता नवीन उच्चांक गाठत आहे.

ऐन लग्नसराईत सोने महाग, ग्राहकांना झटका
लग्नसराईची धामधूम सुरू असताना, सोन्याच्या दरात होणारी वाढ ग्राहकांसाठी मोठी चिंता निर्माण करत आहे. लग्नाच्या खरेदीसाठी सोने हा एक महत्त्वाचा भाग असतो आणि आता महाग झाल्याने ग्राहकांची परिस्थिती कठीण झाली आहे.

सोन्याचा दर नवीन उच्चांक गाठणार
तज्ज्ञांच्या मते, 2025 मध्ये सोन्याचे भाव नवीन उंची गाठू शकतात. देशांतर्गत बाजारात सोन्याचा भाव 85,000 ते 90,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जागतिक आणि स्थानिक आर्थिक घडामोडींमुळे सोन्याच्या दरात ही वाढ होण्याची शक्यता आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.