⁠ 
मंगळवार, नोव्हेंबर 26, 2024
Home | जळगाव जिल्हा | सोने दरात 800 रुपयाची घसरण ; जळगावात प्रति तोळ्याचा भाव किती? तपासून घ्या..

सोने दरात 800 रुपयाची घसरण ; जळगावात प्रति तोळ्याचा भाव किती? तपासून घ्या..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मे २०२४ । मार्च आणि एप्रिल महिन्यात सोने आणि चांदी दराने नवनवीन विक्रम नावावर केल्याचं दिसून आले. ऐन लग्नसराईच्या हंगामात दरात झालेल्या वाढीने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना घाम फोडला होता. मात्र मार्च-एप्रिल महिन्यासारखा मे महिन्याच्या सुरुवातीला सोने-चांदीने कोणताही विक्रम नावावर नोंदवला नाही. या महिन्यातील पाच दिवसांत सोने आणि चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. जळगावच्या सुवर्णनगरीत गेल्या पाच दिवसात सोन्याच्या दरात ८०० रुपयापर्यंतची घसरण दिसून आली आहे. तर उच्चाकांपासून सोने जवळपास २५०० रुपयांपेक्षा अधिकने घसरले आहे.

सध्या जळगावात २४ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ७१,७०० रुपयावर आहे. तर जीएसटीसह सोने ७३८५० रुपयावर आहे. दुसरीकडे चांदीचा दर विनाजीएसटी ८१००० रुपये प्रति किलोवर आहे. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचा दर ७२६०० रुपयांवर होता तर चांदीचा दर तर चांदी ८१ हजार ८०० रुपये प्रति किलो होती. मागणी कमी झाल्याने सोने-चांदीचे भाव कमी झाल्याचे सराफ व्यावसायिकांचे म्हणणे आहे

दरम्यान, एप्रिलच्या मध्यापर्यंत सोने आणि चांदीने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली होती. १९ एप्रिल रोजी सोने दरात मोठी वाढ झाली होती. यामुळे सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव विनाजीएसटी ७४२०० रुपयांवर गेला होता. दुसरीकडे चांदीचा दर ८४०० हजार रुपये प्रति किलोवर गेला होता. मात्र त्यांनतर दोन्ही धातूंमध्ये घसरण दिसून आली. या आठवड्यात ग्राहकांच्या खिशाला कात्री लागली नाही. उच्चाकांपासून सोने जवळपास २५०० रुपयांनी कमी झाले आहे तर चांदी ३००० हजार रुपयांनी घसरली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.