⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | वाणिज्य | ऐन लग्नसराईत सोन्याने ओलांडला 63000 टप्पा, चांदीही वाढली, पहा आजचे नवीन दर

ऐन लग्नसराईत सोन्याने ओलांडला 63000 टप्पा, चांदीही वाढली, पहा आजचे नवीन दर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० नोव्हेंबर २०२३ । मौल्यवान धातूंनी पुन्हा जोरदार उसळी घेतली असून सोने-चांदीने (Gold Silver Price Today) पुन्हा नवीन विक्रम नावावर कोरला. या सर्व घडामोडींमुळे ऐन लग्नसराईत वर आणि वधूकडील मंडळी चिंतेत पडली आहे. सोन्याने विक्रमी धाव घेतल्याने लग्नसोहळ्याच्या आनंदावर विरजण पडले आहे.

सोने-चांदीने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड इतिहास जमा केले. जळगाव सराफ बाजारात एकाच दिवसात सोन्याच्या किमतीत तब्बल ९०० ते १००० रुपयापर्यंतची वाढ दिसून आली आहे. मंगळवारी सायंकाळी २४ कॅरेट सोन्याचा दर ६२३०० रुपये प्रति तोळा इतका होता. त्यात बुधवारी एकाच दिवसात मोठी वाढ होऊन तो ६३,२०० रुपये प्रति तोळ्यापर्यंत पोहोचले आहे.

दुसरीकडे चांदीचा किमतीने देखील मोठी झेप घेतली आहे.चांदीच्या किमतीत देखील एकाच दिवसात १००० रुपयाची वाढ झाली त्यामुळे चांदीचा एक किलोचा दर ७७,८०० रुपयावर पोहोचला. दिवाळीच्या पर्वात १० ते १६ नोव्हेंबरला दरम्यान चांदीचा भाव किलोला ७२ ते ७३ हजार रुपयापर्यंत होता. तर सोन्याचा दर ६१ हजार ते ६१ हजार ३०० रुपये प्रती तोळा इतक्या पर्यंत होता. या नवीन उच्चांकामुळे ग्राहकांचे मात्र डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.