जळगाव जिल्हासोने - चांदीचा भाव

Gold Rate : सोन्याचा भाव पुन्हा वाढला ; जळगावमध्ये आता 10 ग्रॅमसाठी इतके पैसे मोजावे लागणार?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जानेवारी २०२५ । डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी अमेरिकेच्या (America) राष्ट्राध्यक्ष (President United States) पदाची सूत्रं हाती घेतल्यांनंतर सोने (Gold Rate) आणि चांदीच्या किंमती भडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर काही जण किंमती कमी होण्याची शक्यता व्यक्त करत आहेत. दरम्यान या आठवड्याच्या सुरुवातीलाच सोने दरात वाढ दिसून आली. यामुळे जळगावच्या (Jalgaon) सराफ बाजारात विनाजीएसटी २४ कॅरेट सोन्याचा भाव पुन्हा ८० हजाराजवळ पोहोचला. Gold Silver Rate Today

जळगाव सध्या २२ कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी ७३,१६० रुपये प्रति तोळा तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७९,८०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले आहे. जीएसटीसह २४ कॅरेट सोन्याचा दर ८२,२०० रुपयावर पोहोचला आहे. दुसरीकडे चांदीचा एक किलोचा भाव ९२००० हजारावर आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात सोन्याचे भाव पुन्हा कमी होणार?
गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याचे भाव वाढत आहे. सोन्याचे भाव वाढत असल्याने खरेदीदारांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे. सोने चांदीचे भाव पुन्हा एकदा कमी होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. यामागचे कारण म्हणजे मागील वर्षी अर्थसंकल्पान सोन्यावरील इंपोर्ट ड्युटी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी २३ जुलै २०२४ मध्ये निर्मला सितारामन यांनी सोन्यावरील इंपोर्ट ड्यूटी १५ टक्क्यांवरुन ६ टक्के केली होती. यामुळे सोन्याचे भाव चांगलेच कमी झाले होते. त्यामुळे यावर्षी सोन्याचे भाव कमी होणार की नाही असा प्रश्न आता अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button