जळगाव लाईव्ह न्यूज । २० मार्च २०२५ । मार्च महिना सुरु झाल्यापासून सोन्याने आपली झळाळी कायम ठेवली आहे. सध्या सोन्याचा भाव नवा इतिहास रचत उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. मार्चच्या २० दिवसांतच सोन्याने सहावेळा उच्चांक गाठला आहे. एकीकडे लग्नसराई सुरु असताना यातच सोने आणि चांदीचे दर दररोज नवनवीन उच्चांक गाठत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे.

काल बुधवारी जळगावच्या सराफा बाजारात शुद्ध सोन्याचे भाव ८९२०० रुपये (जीएसटीसह ९१८७६) प्रति तोळ्यावर स्थिरावले. मंगळवारी ८८८०० रुपये तोळा असलेले सोन्यात एका दिवसात ४०० रुपयांची वाढ झाली आणि या महिन्यात आतापर्यंत सहाव्यांदा सार्वकालिक उच्चांक गाठला. तर चांदीही दोन दिवसांपासून १,०२,००० रुपये प्रति किलो (जीएसटीसह १, ०५,६००) अशा उच्चांकावर आहे.
गेल्या वर्षी १९ मार्चला सोन्याचे भाव ६६ हजार तर चांदी ७५००० रुपये किलो होती. सोन्याच्या तेजीने वर्षभरात २३, २०० रुपयांचा (२६.०९ टक्के) भरघोस परतावा दिला आहे. केंद्रीय मध्यवर्ती बँकांकडून सोन्याची जोरदार खरेदी, भू-राजकीय तणाव, डॉलरच्या तुलनेत कमकुवत रुपया (८६.३२) आणि शेअर बाजारातील अस्थिरता अशी भाववाढीची कारणे आहे.
मार्च प्रति तोळ्याचे दर :
१ मार्च (८५४००), ३ मार्च (८५७००), ४ मार्च (८६९००), १३ मार्च (८७३००), १४ मार्च (८८६००), १८ मार्च (८८८००), १९ मार्च (८९२००) (जीएसटीसह ९१८७६).