---Advertisement---
जळगाव जिल्हा

Gold Rate : आठवडाभरात सोने तीन हजारांनी घसरले, जळगाव सुवर्णनगरीतील आजचे नवीन दर तपासून

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२५ । सोन्याच्या दरात चढ उतार सुरूच असून तीन दिवसाच्या घसरणीनंतर सोन्याचा भाव वधारला. शुक्रवारी संपलेल्या आंतरराष्ट्रीय सोने बाजाराच्या शेवटच्या दिवशी जळगावच्या सुवर्णपेठेत सोने दरात वाढ झाली.

gold silver jpg webp

सोने ४०० रुपयांनी वाढून ९३२०० (जीएसटीसह ९५९९६) रुपये तोळा झाले. तर चांदीतही एक हजारांची वाढ झाली. या आठवड्यात सोन्याच्या दरात तब्बल ३ हजार रुपयांची घसरण नोंदवली गेली आहे.

---Advertisement---

गेल्या पंधरवड्यात १ लाखावर पोहोचलेल्या सोन्याच्या दरात या आठवड्यात तीन दिवस घसरण तर दोन दिवस वाढ दिसून आली. गेल्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी (दि. ५) सोने ९६८०० (जीएसटीसह ९९७०४) होते. ते शेवटच्या दिवशी शुक्रवारी ९५८०० झाले. आठवडाभरात १ हजाराची घसरण झाली. तर चालु आठवड्यात ९३८०० रुपयावर शेवटच्या दिवशी ९२८०० वर सोने खाल आले आहे.

ही एक हजारांची घसरण असली तरी १३ तारखेला सोन्याचे दर ९४८०० पर्यंत गेले होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ बंद असताना शनिवार व रविवारी सोन्याच्या दरात (देशातंर्गत आलेल्या तेजीमुळे सोने ९६८०० जीएसटीसह ९९७०४) वर पोहचले होते

जीएसटीसह १ लाख रुपये तोळ्यावर पोहचलेले सोने चालु आठड्यात जीएसटीसह ९५ हजार रुपयांवर आल्याने जून महिन्यात लग्नसराई असलेल्या ग्राहकांसाठी दरातील ही घसरण फायदेकारक असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.जून महिन्यात लग्नसराई असलेल्या ग्राहकांसाठी दरातील ही घसरण फायदेकारक असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment