⁠ 
शनिवार, मे 11, 2024

सोने-चांदीने ग्राहकांना दिलासा ; आजचा प्रति 10 ग्रॅमचा भाव पहा..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ फेब्रुवारी २०२४ । मागील काही काळात सोन्यासह चांदीचे दर चांगलेच महागले आहे. डिसेंबर महिन्याच्या मध्यन्तरी दोन्ही धातूंच्या किमतीने नवीन उच्चांक गाठला होता. यामुळे ग्राहकांना मोठी झळ बसली होती. मात्र जानेवारीत सोन्यासह चांदीच्या किमतीत घसरण दिसून आली. तसेच फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठ्वड्यात सोने-चांदीने ग्राहकांना दिलासा दिला आहे. गेल्या आठवड्यात पण मौल्यवान धातूने दिलासा दिला होता. जागतिक बाजारातील घाडमोडींमुळे सोने-चांदी स्वस्त झाले आहे. Gold Silver Rate 9 February 2024

सोन्याचा भाव असा
या महिन्याच्या सुरुवातीला सोने वधारले. 1 फेब्रुवारीला सोने 170 रुपयांनी तर 2 फेब्रुवारीला 160 रुपयांनी भाव वधारले आणि 3 फेब्रुवारीला 220 रुपयांनी स्वस्त झाले. 5 फेब्रुवारीला 150 रुपयांनी तर 6 फेब्रुवारीला 220 रुपयांनी सोने स्वस्त झाले. 7 फेब्रुवारी रोजी 180 रुपयांनी किंमती वधारल्या. 8 फेब्रुवारी रोजी किंमतीत किंचित घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 58,140 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,320 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीचा भाव असा
जानेवारी महिन्यात चांदी 4400 रुपयांनी स्वस्त झाली होती. तर शेवटी 2 हजारांनी वधारली होती. 2 फेब्रुवारी रोजी चांदीत 200 रुपयांची वाढ झाली. 3 फेब्रुवारी रोजी 1,000 रुपयांनी भाव उतरले. 5 फेब्रुवारीला 300 तर 6 फेब्रुवारी किंमती 700 रुपयांनी कमी झाल्या. 7 आणि 8 फेब्रुवारीला बदल झाला नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 73,500 रुपये आहे.

MCX वरील सोने चांदीचा दर
मात्र दुसरीकडे आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजार उघडताच चांदीच्या दरात किंचित वाढ झाली असली तरी सोन्याचे भाव मात्र स्थिर आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCX वर सोने 0.04 टक्क्यांच्या घसरणीसह 62,420 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करत आहे, तर चांदी 0.11 टक्क्यांनी वाढून 78 रुपयांनी 70,915 रुपये प्रति किलोवर ट्रेंड करत आहे.