हमासच्या दहशतवाद्यांनी इस्त्रायलवर हल्ला केलेमुळे प्रत्युत्तरात इस्त्रायलने (Israel) युद्धाची घोषणा केली आहे. आता या युद्धाचे पडसाद मौल्यवान धातूंवर होताना दिसत आहे. जागतिक बाजारपेठेत सोने-चांदीच्या (Gold Silver Price) दरांनी मोठी उसळी घेतलीये. सराफा बाजारातून आजचे सोने-चांदीचे दर जाहीर करण्यात आलेत. त्यानुसार २४ कॅरेट सोन्याचे दर ५८ हजाराच्या आसपास पोहोचला आहे.
मागील काही दिवसापासून सोन्यासह चांदीच्या किमतीत घसरण सुरु होती. भारतात पितृपक्ष सुरु असून या काळात कोणतीही नवीन वस्तू खरेदी करणे शुभ मानण्यात येत नसल्याने ग्राहकांनी दागिने खरेदीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे सोने-चांदीने गेल्या चार महिन्यातील निच्चांक गाठला आहे.
मात्र, सोन्याच्या दरांनी आज मोठी उच्चांकी गाठलीये. २४ कॅरेट १ तोळा सोन्याची किंमत ३१० रुपयांनी वाढलीये. त्यानुसार प्रति तोळा सोन्याचे दर ५७,६९० रुपयांवर पोहचलेत. २२ कॅरेट सोन्याचे दरांत २५० रुपयांनी वाढ झालीये. त्यानुसार प्रति तोळा सोन्याची किंमत ५२,९०० रुपये प्रति तोळा आहे. युद्धामुळे चांदीच्या दरांमध्येही मोठी वाढ झालीये. चांदीचे ६९,५०० रुपये प्रति किलोवर पोहचलीये.
जळगाव सुवर्णनगरीत दोन दिवसात सोन्याच्या किमतीत तब्बल 400 रुपयाची वाढ झालेली दिसून येतेय. शुक्रवारी सकाळी २४ कॅरेट सोन्याचा दर ५७,५०० रुपयांवर होता. तो आज सकाळी ५७,९०० रुपयांवर गेला आहे. तर चांदीचा एक किलोचा दर ६८,५०० रुपयांवर होता. तो आज सकाळी ६९,५०० रुपयांवर गेला आहे.