⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | वाणिज्य | खुशखबर! धनत्रयोदशी पूर्वीच सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, पहा आजचा 10 ग्रॅमचा भाव

खुशखबर! धनत्रयोदशी पूर्वीच सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, पहा आजचा 10 ग्रॅमचा भाव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ नोव्हेंबर २०२३ । धनत्रयोदशी (Dhantrayodashi) आणि दिवाळी (सारखा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून यात सोने खरेदीसाठी योजना आखलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या किमतीत मोठी घसरण होताना दिसत आहे. जगभरात सुरू असलेल्या चढ-उतारांदरम्यान सोन्याने विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर पुन्हा घसरण सुरू झाली आहे.

MCX वर सोन्या-चांदीची किंमत
आज सलग दुसऱ्या दिवशी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सकाळच्या सत्रात सोन्याच्या किमतीत घसरण झालेली दिसून आली. सोबतच चांदीही घसरली आहे. आज बुधवारी सकाळी 11.30 वाजेपर्यंत सोन्याचा भाव किंचित 22 रुपयांनी घसरून 60,325 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. याशिवाय चांदीचा भाव 254 रुपयांनी घसरून 70,380 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.

दरम्यान, गेल्या महिन्यात इस्त्राईल आणि हमास यांच्यात युद्ध सुरु होण्यापूर्वी सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ५७ हजाराच्या घरात आला होता. तर चांदीचा दर ६८ हजाराच्या घरात आला होता. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र युद्धामुळे दोन्ही धातूनी मोठी उसळी घेतली. ऑक्टोबर महिन्यात सोने-चांदीच्या दरात 4 हजारांची वाढ झाली. या दरवाढीने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. यामुळे दिवाळीपर्यंत सोन्याचा दर कुठवर जाणार याकडे ग्राहकांचे लक्ष लागून होईल.

दरम्यान, मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या किमतीत चढ उतार दिसून येत आहे. MCX वर सलग तिसऱ्या दिवशी सोन्यासह चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे. धनत्रयोदशीपूर्वी ही घसरण कायम राहिल्यास ग्राहकांच्या खिशावर ताण येणार नाही.

जळगावमधील सोने चांदीचा दर
जळगावमध्ये गेल्या दोन तीन दिवसात सोन्याच्या दरात ५०० रुपयापर्यंतची घसरण झालेली दिसून येतेय. यापूर्वी सोमवारी (6 नोव्हेंबर) सकाळच्या सत्रात सोन्याचा दर विनाजीएसटी 61700 रुपये प्रति तोळ्यापर्यंत होते ते आज सकाळच्या सत्रात विनाजीएसटी 61200 रुपयावर आले आहे. आज चांदीचा दर 71800 रुपये प्रति किलोवर आला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.