---Advertisement---
वाणिज्य सोने - चांदीचा भाव

Gold Silver Price : सोन्याच्या भावात पुन्हा वाढ, चांदीही महागली ; तपासून घ्या आजचे दर

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जुलै २०२२ । सोने आणि चांदीच्या (Gold Silver Rate Today) भावात चढ-उतार सुरूच आहे. गेल्या दोन दिवसात सोन्याच्या भावात मोठी घसरण दिसून आली. मात्र आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या भावात पुन्हा वाढ झाली आहे. आज शुक्रवारी १० ग्रॅम सोन्याच्या भावात १३० रुपयाची वाढ झालीय आहे. तर दुसरीकडे चांदी देखील महागली असून आज चांदीच्या भावात २१० रुपयाची वाढ झाली आहे. यापूर्वी कालच्या सकाळच्या सत्रात सोने ८२० रुपयाने तर चांदी १४० रुपयांनी स्वस्त झाली होती. Gold Silver Price Today

gold silver jpg webp

काय आहे आजचे सोन्याचे भाव?
आज जळगाव सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव ५१,८१० रुपयांवर गेला आहे. तर एक किलो चांदीचा भाव ५८,२७० रुपये इतका आहे. तुमच्या माहितीसाठी सोन्या-चांदीचे दर दिवसातून दोन वेळा बदलतात आणि त्यानुसार सराफा बाजारात सोन्या-चांदीचे भाव बदलतात. या बदलासह नवीन किंमतीत बाजारात सोन्या-चांदीची विक्री होते.

---Advertisement---

गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने (Central Government) आयात शुल्कात वाढ केल्यानंतर सलग तीन दिवस सोन्याच्या दरात वाढ झाली. मात्र त्यानंतर सलग दोन दिवस सोन्याच्या भावात घसरण झाली होती. या दोन दिवसात सोने १६०० रुपयांहून अधिकने स्वस्त झालं होते. तर दुसरीकडे चांदी तब्बल १८०० रुपयांनी घसरलेली होती.

आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले
०४ जुलै २०२२ – रुपये ५३,१३० प्रति १० ग्रॅम
०५ जुलै २०२२ – रुपये ५३,३४० प्रति १० ग्रॅम
०६ जुलै २०२२ – रु ५२,५०० प्रति १० ग्रॅम
०७ जुलै २०२२ – रु ५२,६८० प्रति १० ग्रॅम

या आठवड्यात चांदीचा दर किती बदलला
०४ जुलै २०२२- रुपये ५९,१०० प्रति किलो
०५ जुलै २०२२ – रुपये ५९,८६० प्रति किलो
०६ जुलै २०२२- रुपये ५८,२०० प्रति किलो
०७ जुलै २०२२- रुपये ५८,०६० प्रति किलो

अशी तपासा सोन्याची शुद्धता
सोन्याची शुद्धता तुम्हाला घरबसल्या तपासता येते. BIS Care App च्या माध्यमातून तुम्ही सोन्याचा शुद्धपणा तपासू शकता. एवढेच नाही तर तुम्हाला सोन्यात भेसळ असल्याचे समजले अथवा सोन्याच्या व्यवहारात तुमची फसवणूक झाल्यास या अॅपवर तुम्हाला तक्रार ही दाखल करता येते. तक्रारीची दखल घेतल्यासंबंधीची माहिती ही अॅपद्वारे तुम्हाला प्राप्त होईल.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---