जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जुलै २०२४ । मागील गेल्या एक ते दीड महिना लग्नसराईला मुहूर्त नव्हते. मात्र आता लग्नाचा मोसम सुरू होत असून अनेक घरांमध्ये लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. मात्र, या सगळ्यात सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे खरेदीदारांचे टेन्शन वाढले आहे. मे महिन्यात ऐतिहासिक उच्चांक गाठणाऱ्या सोने आणि चांदीच्या दरात जून महिन्यात दिलासा मिळाला. मात्र जून महिन्यातील नरमाईची कसर चांदीने जुलैच्या पहिल्या सत्रातच भरुन काढली. सोन्याचा दर पुन्हा ७३ हजारावर गेला आहे.
जळगाव सुवर्णनगरीत मागील काही दिवसापासून सोन्याचा दर विनाजीएसटी ७२ हजाराच्या घरात खेळत होता. मात्र या आठवड्यात सोन्याच्या दरात तब्बल १५०० रुपयापर्यंतची वाढ दिसून आली. यामुळे सोन्याचा दर आता प्रति १० ग्रॅम ६३,६०० रुपयांवर जाऊन पोहोचला आहे.
दुसरीकडे चांदीच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. या आठवड्यात चांदीच्या दरात तब्बल दोन ते अडीच हजार रुपयाची वाढ झाली. यामुळे आता चांदीचा एक किलोचा दर विनाजीएसटी ९१ हजार रुपयावर गेला आहे