⁠ 
रविवार, जुलै 14, 2024

खरेदीदारांना दिलासा ! चांदी 2000 रुपयांनी घसरली, सोने… पहा आजचे भाव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । 7 फेब्रुवारी 2024 । सोने-चांदीने खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीलाच मौल्यवान धातूच्या किंमतीत मोठी घसरण झाली. मागच्या पाच दिवसात चांदी दोन हजार रुपयांनी घसरली आहे. तर सोने ३०० रुपयांनी घसरलेले दिसून आले. Gold Silver Rate 7 February 2024

जानेवारी महिन्यात सोन्यात चढउताराचे सत्र असले तरी डिसेंबर २०२३ सारखा सर्वकालीन उच्चांक गाठता आला नाही. फेब्रुवारीच्या सुरुवातील दरवाढ झाली. १ फेब्रुवारी रोजी सोने १७० रुपयांनी तर २ फेब्रुवारीला १६० रुपयांनी भाव वधारले. तर ३ फेब्रुवारी रोजी किंमतीत २२० रुपयांची घसरण झाली. ५ फेब्रुवारी रोजी १५० रुपयांनी भाव उतरले. ६ फेब्रुवारी रोजी भाव २२० रुपयांनी स्वस्त झाले. गुडरिटर्न्सनुसार, आता २२ कॅरेट सोने ५७,८०० रुपये प्रति १० ग्रॅम तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ६३,१०० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.

दुसरीकडे चांदीच्या दरात मोठी घसरण दिसून आली. १ फेब्रुवारीला ७३ हजार रुपयांवर असलेला चांदीचा दर आता ७१ हजार रुपयांवर आला आहे. दरम्यान, येत्या दोन आठवडयात चांदीच्या दरात चढ-उतार असाच सुरू राहणार असल्याचा अंदाजही व्यावसायिकांनी वर्तवला आहे.

जळगावातील आजचा भाव :
जळगावात आता २२ कॅरेट सोने विनाजीएसटी ५७,७०० रुपये प्रति १० ग्रॅम तर २४ कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी ६३,००० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. तर चांदीचा एक किलोचा भाव विनाजीएसटी ७१,००० रुपयावर आला आहे.