⁠ 
सोमवार, मे 6, 2024

अरे देवा! सोन्याच्या किमतीने गाठला नवा उच्चांक, जळगावमधील प्रति तोळ्याचा भाव पाहा..

जळगाव लाईव्ह न्यूज । 6 मार्च 2024 । चालू आर्थिक वर्षाच्या अखेरच्या महिन्यात, मार्चमध्ये मौल्यवान धातूच्या किंमती वाढण्याचा अंदाज होता. तो अखेर खरा ठरला. सोन्याच्या किमतीने आतापर्यंतची मोठी झेप घेतली आहे. यामुळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. दरम्यान, आगामी दिवसात सोने ७०,००० रुपयांच्या घरात पोहचणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याच्या भावात वाढ होऊन एकाच दिवसात सोने ८५० रुपयांनी वधारले. यामुळे जळगावमध्ये सोन्याचे भाव उच्चांकी पातळीवर थेट ६४ हजार ७०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले. मात्र दुसरीकडे चांदीच्या किमतीत दिलासा मिळाला आहे. जळगावात चांदीच्या भावात ७०० रुपयांची घसरण होऊन ती ७२ हजार ८०० रुपये प्रतिकिलोवर आली. २ मार्चपासून सोन्याच्या भावात वाढ सुरू झाली. २ मार्च रोजी ६५० रुपयांची वाढ होऊन सोने ६३ हजार ७५० रुपयांवर पोहोचले. सोमवार आणि मंगळवारी तेजी कायम राहिली.

दरम्यान, सध्याच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडीमुळे सोने ७० हजारांच्या घरात जाणार असल्याचा अंदाज आहे. चांदी पण लकाकणार आहे. जळगावात गेल्या तीन दिवसात सोन्याच्या किमतीत जवळपास १००० ते ११०० रुपयापर्यंतची वाढ झालीय. दुसरीकडे चांदीही १००० रुपयांनी महागली असल्याचं दिसून येत आहे.