⁠ 
सोमवार, जुलै 22, 2024

एका दिवसात चांदी 1000 रुपयांनी घसरली, सोनेही झाले स्वस्त ; ग्राहकांना खरेदीची संधी..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जानेवारी २०२४ । सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा देणारी बातमी आहे. सलग तिसऱ्या दिवशी सोने-चांदी दरात घसरण झाली. जळगाव सुवर्णनगरीत तीन दिवसांत सोने दरात तब्बल एक हजार रुपयांहून अधिकची घसरण झाली. तर चांदी दरात 2000 रुपयांपर्यंतची घसरण झाली. Gold Silver Rate 6 January 2024

गेल्या डिसेंबर महिन्यात मौल्यवान धातूंनी कमाल दाखवली. सोने-चांदीच्या किंमतींनी नवीन उच्चांक गाठला. सोने विनाजीएसटी 64 हजार रुपयावर तर जीएसटीसह 66 हजारांवर पोहचले होते. तर चांदीने देखील पण मोठा पल्ला गाठला होता. यामुळे एन लग्नसराईत दागिने बनविणाऱ्या ग्राहकांना घाम फुटला होता. नवीन वर्षात दोन्ही धातूंची घौडदौड कायम होती. मात्र, 3 जानेवारीपासून किंमतीत घसरण सुरु झाली.

जळगावमध्ये एका दिवसात सोन्याच्या दरात 200 रुपयांची घसरण झाली तर चांदीच्या दरात तब्बल 1000 हजार रुपयाची घसरण झाली. यामुळे जळगावात आता 22 कॅरेट सोने विनाजीएसटी 57,800 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी 63,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर दुसरीकडे चांदीचा दर विनाजीएसटी 73000 रुपये प्रति किलोवर आला आहे.

दरम्यान, बुधवारी (3 जानेवारी) रोजी सकाळच्या सत्रात 24 कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी 64,150 रुपयावर विकला जात होता. तर चांदीचा दर 75000 रुपये किलोने विकला जात होता. त्यात गेल्या तीन दिवसात सोन्याच्या दरात तब्बल 1050 रुपयाची घसरण झालेली दिसून येतेय. तर चांदीच्या दरात 2000 रुपयांची घसरण झाली. यामुळे दागिने बनविणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.