⁠ 
बुधवार, मे 1, 2024

सोन्याचा दर 7 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर ; आजचा प्रति तोळ्याचा दर काय?

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑक्टोबर २०२३ । मागील गेल्या काही दिवसापासून सोन्या-चांदीच्या (Gold Silver Rate) दरात सातत्याने घसरण सुरू आहे. जागतिक बाजारात मोठ्या प्रमाणात झालेल्या घसरणीमुळे सोन्याचा भाव 7 महिन्यांतील नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. चांदीच्या किमतीत देखील मोठी घसरण झालेली पाहायला मिळतेय. असं असले तरी सध्या भारतात सुरु असलेल्या पितृपक्षामुळे अनेक जणांनी खरेदीकडे पाठ फिरवली आहे.

दरम्यान, आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर घसरणीला ब्रेक लागला आहे. बाजाराच्या सुरुवातीलाच सोने आणि चांदी हिरव्या चिन्हाने व्यवहार करत आहे. सकाळी 10 वाजेपर्यंत सोनं 160 रुपयांनी वाढून 56,881 रुपये प्रति 10 ग्रॅमने व्यवहार करत आहे. दुसरीकडे चांदीचा दर 548 रुपयांनी वाढून 67,433 प्रति किलोने व्यवहार करत आहे.

जळगावमधील दर?
जळगाव सुवर्णनगरीत सध्या सकाळच्या सत्रात 22 कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी 52,800 रुपये प्रति तोळा इतका आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 57,700 रुपये प्रति 10 ग्रॅमवर विकला जात आहे. दुसरीकडे चांदीचा प्रति किलोचा दर 68,300 रुपये प्रति किलोने विकला जात आहे.