जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मे २०२३ । जागतिक बाजारातील अस्थिरतेचा परिणाम सोने आणि चांदीच्या किमतीवर दिसून आला आहे. यामुळे देशांतर्गत बाजारात दोन्ही धातूंच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे. सोन्याच्या किमतीत वाढ सुरूच आहे. आता सोन्याच्या दराने ऐतिहासिक पातळी गाठली आहे. विना जीएसटी सोन्याच्या किमतीने 62 हजाराचा टप्पा गाठला आहे. Gold Silver Rate Today
सोन्याच्या किमतीत एकाच दिवसात 900 रुपयांहून अधिकची वाढ दिसून आली आहे, त्यामुळे सोन्याच्या किमतीने आतापर्यंतची विक्रमी पातळी गाठली असून सोन्याने आता 62000 रुपये प्रति 10 ग्रॅमचा टप्पा पार केला आहे. यासोबतच चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे.
नवं संकट! जाणून घ्या IMD चा इशारा..
काय आहे सोन्याचा दर? Gold Rate
जागतिक बाजारातील मजबूत ट्रेंडमध्ये काल सायंकाळी सोन्याचा भाव 940 रुपयांनी वाढला. सोन्याच्या दरात 940 रुपयांनी वाढ झाल्याने आता प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव 62,020 रुपये (विनाजीएसटी) झाला आहे. तर जीएसटीसह सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव 63,900 रुपयापर्यंत गेला आहे. येत्या दीड महिन्यात सोन्याचा भाव 65000 रुपयांवर जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
चांदीचा दर? Silver Rate
यासोबतच चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. चांदीच्या दरात 700 रुपयापर्यंतची वाढ झाली आहे. या वाढीमुळे आता चांदीचा भाव 77000 रुपये (विनाजीएसटी) प्रति किलोवर पोहोचला आहे. चांदी लवकरच 85000 हजार रुपयाचा टप्पा पार करण्याची शक्यता वर्तविली आहे.
मल्टी-कमोडिटी एक्सचेंजवरील आजचा दर
मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सकाळी 10.30 वाजेपर्यंत सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झालेली दिसून आली. सोन्याचा दर 63 रुपयांनी वधारला असून यामुळे 24 कॅरेट सोन्याचा दर 61,556 प्रति तोळ्यावर व्यवहार करत आहे. तर दुसरीकडे चांदी दर 147 रुपयांनी वाढला असून एक किलोचा चांदीचा दर 78,185 रुपयांवर व्यवहार करत आहे.