जळगाव लाईव्ह न्यूज । ५ फेब्रुवारी २०२३ । कोरोना महामारीदरम्यान, ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने 56,200 इतका उच्चांक दर गाठला होता. मात्र त्यानंतर आता अडीच वर्षानंतर सोन्याच्या (Gold Rate) किमतीने आतापर्यंतचा सर्व रेकॉर्ड मोडले आहे. ऐन लग्नसराईत सोने आणि चांदीचे (Silver Rate) दर प्रचंड वाढले आहे. या आठवड्यात पहिल्यांदाच सोन्याने 58 हजाराचा टप्पा ओलांडला होता. Gold Silver Rate Today
आठवड्याभरात सोने-चांदी किती महागली?
या व्यावसायिक आठवड्यात सोन्याच्या दरात जवळपास 800 रुपये प्रति 10 ग्रॅम वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात 1400 रुपयापर्यंतची वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, या व्यावसायिक आठवड्याच्या सुरुवातीला (30 जानेवारी ते 3 फेब्रुवारी) म्हणजेच 30 जानेवारी रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर 57,079 होता, जो वाढून 57,800 रुपये इतका आहे. तर दुसरीकडे चांदीची किंमत 68,149 रुपयांवरून 69,539 रुपये प्रति किलो झाली आहे.
उल्लेखनीय आहे की IBGA ने जारी केलेल्या किमती वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या मानक किमतीची माहिती देतात. या सर्व किमती कर आणि मेकिंग चार्जेसच्या आधीच्या आहेत. IBGA द्वारे जारी केलेले दर देशभरात सामान्य आहेत परंतु त्यांच्या किमतींमध्ये GST समाविष्ट नाही.
जळगावातील दर
शुक्रवारच्या दिवसभर चढउतारानंतर सोने 800 रुपयांनी घसरले होते. त्यामुळे जळगाव सवर्णनगरीत साेन्याचे दर 57 हजार 800 रुपये प्रतिताेळा झाले हाेते. तर दुसरीकडे चांदीचा दर 68000 रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय जगतात अमेरिकन सेंट्रल बँकेने साेन्याची खरेदी सुरू केल्याने गुरुवारी साेन्याच्या प्रतिताेळ्याच्या दरात अचानक 1800 रुपयांची तेजी नाेंदवली गेली.
या आठवड्यात सोन्याचा दर किती बदलला?
30 जानेवारी 2022 – 57,079 रुपये प्रति 10 ग्रॅम
31 जानेवारी 2022 – रु 56,865 प्रति 10 ग्रॅम
01 फेब्रुवारी 2022 – रु 57,910 प्रति 10 ग्रॅम
02 फेब्रुवारी 2022 – 58,882 रुपये प्रति 10 ग्रॅम
03 फेब्रुवारी 2022 – रु 57,800 प्रति 10 ग्रॅम
04 फेब्रुवारी 2022 – बाजार सुट्टी
या आठवड्यात चांदीचा दर किती बदलला?
30 जानेवारी 2022 – रुपये 68,149 प्रति किलो
31 जानेवारी 2022 – रुपये 67,671 प्रति किलो
01 फेब्रुवारी 2022 – रुपये 69,445 प्रति किलो
02 फेब्रुवारी 2022 – रु 71,576 प्रति किलो
03 फेब्रुवारी 2022 – रुपये 69,539 प्रति किलो
04 फेब्रुवारी 2022 – बाजार सुट्टी