⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024
Home | जळगाव जिल्हा | आनंदवार्ता ! सोने-चांदी दरात अचानक मोठी घसरण.. पहा काय आहे भाव

आनंदवार्ता ! सोने-चांदी दरात अचानक मोठी घसरण.. पहा काय आहे भाव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२४ । जून महिना सुरू होण्यापूर्वीच सराफा बाजारातून चांगली बातमी समोर आली आहे. सतत गगनाला भिडणाऱ्या सोन्या-चांदीच्या किमती आता खाली आल्या आहेत. काल गुरुवारी चांदी दरात जवळपास १००० रुपयांपेक्षा जास्त घसरण झाली. तर सोनेही ६०० रुपयांनी घसरले.

यामुळे आता जळगावात २४ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ७२,४०० रुपये प्रति दहा ग्रॅम वर आले आहे. तर जीएसटीसह सोने ७४,५७० रुपयांवर विकले जात आहे. दुसरीकडे काल झालेल्या घसरणीमुळे आता चांदीच एक किलोचा भाव विनाजीएसटी ९३,००० रुपये प्रति किलोवर आला आहे.

मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात सोने आणि चांदीने चांगला कहर केला. गेल्या आठवड्यात सोन्याने ७५ हजारांचा टप्पा ओलांडला होता. तर चांदी ९६ हजारांच्या घरात पोहचली होती. बाजारातील तज्ज्ञांच्या मते सोने लवकरच ८१००० रुपयांची सलामी देईल. तर चांदीचा एक लाखांच्या घरात असेल. या आठवड्यात दोन्ही मौल्यवान धातूंनी मोठी चढाई केली होती. मात्र आता या दरवाढीला ब्रेक लागला. सोने-चांदीत पडझड झाली.

गेल्या आठवड्यात सोने घसरणीवर होते. सोन्याची किंमत जवळपास २९०० रुपयांनी उतरली होती. या आठवड्याच्या सुरुवातीला चार दिवसांत त्यात ७०० रुपयांची वाढ झाली. दुसरीकडे चांदीत चार हजार रुपयाची वाढ झाली होती. मात्र गुरुवारी दोन्ही धातूंमध्ये घसरण झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.