⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

ग्राहकांसाठी खुशखबर! सोने-चांदीच्या किंमतीत घसरण, पहा आताचे भाव?

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ डिसेंबर २०२३ । भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार सुरूच आहे. वर्षाअखेरीस सोने-चांदीने ग्राहकांसाठी आनंदवार्ता आणली. मागील दोन आठवड्यात सोने-चांदीचे दर चांगलेच वधारले होते. यामुळे ऐन लग्नसरात वधारलेल्या किमतीमुळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठी झळ बसली. अनेक ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरवली होती. मात्र आता सोने-चांदीच्या किंमतीत घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला. Gold Silver Rate 31 December 2023

गुडरिटर्न्सनुसार, या आठवड्यात दरवाढीनंतर सोने स्वस्त झाले. 26 डिसेंबर रोजी भाव 200 रुपयांनी उसळी घेतली. तर 27 डिसेंबर रोजी 100 रुपयांची दरवाढ झाली. 28 डिसेंबर रोजी किंमतीत 400 रुपयांची वाढ झाली. 29 डिसेंबर रोजी त्यात 400 रुपयांची घसरण झाली. 30 डिसेंबर रोजी भावात सकाळी बदल झालेला नाही. सध्या 22 कॅरेट सोने विनाजीएसटी 58,700 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी 63,970 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

त्याचप्रमाणे चांदीच्या दरात या आठवड्यात 25 डिसेंबर आणि 26 डिसेंबर रोजी अनुक्रमे 200 आणि 300 रुपयांची दरवाढ झाली. तर 27 डिसेंबर रोजी 300 रुपयांनी किंमती उतरल्या. 28 डिसेंबर रोजी 300 रुपयांची दरवाढ झाली. 29 डिसेंबर रोजी किंमती 1200 रुपयांनी वधारल्या. 30 डिसेंबर रोजी सकाळी भाव अपडेट झाला नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 78,300 रुपये आहे.

जळगाव सुवर्णनगरीमधील दर
जळगाव सुवर्णनगरीमध्ये सोने दर दहापैकी नऊ दिवस 65 हजारांवरच राहिला आहे. शनिवारी सोन्याचे दर जीएसटीसह 65,508 रुपये तोळा होते. दहा दिवसांपूर्वी 21 डिसेंबर रोजी सोने प्रतितोळा 64,890 होते. त्यात लागोपाठ दोन दिवस 200 ते 250 रुपयांची वाढ 1 झाली. 24 व 25 डिसेंबरला दर स्थिर होते. 28 रोजी 4 डिसेंबरच्या (66,229) उच्चांकी पातळीपेक्षा अवघे 52 रुपये कमीसह 66,177 पर्यंत वाढले; परंतु 29 रोजी पुन्हा ते जीएसटीसह 65,508 रुपयांवर पोहोचले आहेत.

विनाजीएसटी 22 कॅरेट सोन्याचा दर 58,260 रुपये इतका आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी 63,300 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. त्याच प्रमाणे चांदीचा दर विनाजीएसटी 76,000 रुपये प्रति किलो इतका आहे.