जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२३ । या महिन्याच्या सुरुवातीला सोने-चांदीत (Gold Silver Rate Today) घसरणीचे सत्र सुरु होते. परंतु जागतिक घडामोडींमुळे सर्वच गणितं बिघडली. गेल्या काही दिवसापूर्वी सात महिन्याच्या नीच्चांकीवर आलेल्या सोन्याच्या दराने पुन्हा मोठी उसळी घेतली आहे. दिवाळीत सोन्याचा दर नवीन रेकॉर्ड करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर चांदी पण मोठा पल्ला गाठण्याची शक्यता आहे.
या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोन्याचे दर घसरून ५७ हजार रुपये प्रति तोळ्यावर आला होता. तर चांदीचा दर ६८ हजारावर आला होता. मात्र जाणकारांनी दिवाळीत ते ६२ हजारांचा टप्पा गाठण्याचा अंदाज व्यक्त केला होता. परंतु दिवाळीआधीच सोन्याच्या दराने ६२ हजारांचा टप्पा पार केला.
दरम्यान, काही तज्ज्ञांच्या मते, नोव्हेंबर महिन्यात या वर्षातील सर्व रेकॉर्ड मोडू शकतात. दिवाळीत सोन्याचा दर ६४००० रुपये प्रति तोळ्यावर जाण्याची शक्यता जाणकारांनी वर्तविली आहे.
काय आहे आजचा दर?
जळगाव सुवर्णनगरीत सध्या २२ कॅरेट सोन्याचा दर ५६,७०० रुपये प्रति तोळा इतका आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा ६२,५०० रुपये प्रति तोळ्यावर गेला आहे. दुसरीकडे चांदीचा दर ७३,२०० रुपये प्रति किलोवर आला आहे.