---Advertisement---
वाणिज्य

सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदवार्ता ; भावात मोठी घसरण, जळगावात ‘हा’ आहे आजचा भाव?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२३ । सोने-चांदीने आनंदवार्ता आणली आहे. गेल्या दोन आठवड्यात सोन्यासह चांदीने मोठी भरारी घेतली होती. त्याला ब्रेकच लागत नसल्याने ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरवली होती. पण वर्षाअखेर सोन्याच्या किंमतींना ब्रेक लागला. शुक्रवारी सायंकाळी सोन्याच्या दरात 400 रुपयांची घसरण झाली. मात्र दुसरीकडे चांदीचा दर स्थिर दिसून आला. Gold Silver Rate 30 December 2023

gold silver jpg webp

जळगावच्या सुवर्ण नगरीत आता 22 कॅरेट सोने 58,450 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,800 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. यापूर्वी कालच्या सकाळच्या सत्रात 24 कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी 64,200 रुपयांनी विकला जात होता. त्यात घसरण झाली. मात्र दुसरीकडे चांदीचा दर स्थिर आहे. सध्या एक किलो चांदीचा विनाजीएसटी दर 76000रुपये इतका आहे.

---Advertisement---

घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---