---Advertisement---
जळगाव जिल्हा बातम्या वाणिज्य

Gold Silver Rate : सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात वाढ, चांदीही वधारली, आजचा भाव पहा..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जानेवारी २०२५ । गेल्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये सोन्यासह चांदीच्या किमतीमध्ये मोठे बदल झाले. मागच्या वर्षात आतापर्यंतचे दरवाढीचे सर्व रेकॉर्ड तोडले गेले. आता या नवीन वर्षात तरी भाव खाली येतील, अशी आशा ग्राहकांना लागली आहे. मात्र सलग दुसऱ्या दिवशी सोने दरात वाढ झालीय. सोबतच चांदीचा दर देखील वधारला आहे. दरम्यान या नवीन वर्षात सोन्याचा भाव प्रति तोळा ८५ ते ९० हजार रुपयांपर्यंत जाणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. Gold Silver Rate Today

GS3 January

जळगावच्या सुवर्णपेठत सलग दुसऱ्या दिवशी सोने महागले. गुरुवारी सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ६०० रुपयांनी वाढला. यामुळे आज शुक्रवारी सकाळच्या सत्रात २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा ७१,०५० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ७७,५०० रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचले आहे. दुसारिखे चांदीच दर १००० रुपयांनी वाढला असून यामुळे आता एक किलो चांदीचा दर विनाजीएसटी ८९००० रुपयावर गेला आहे.

---Advertisement---

डिसेंबरच्या अखेरच्या टप्प्यात सोने ५०० रुपयापर्यंत महागले. या आठवड्याच्या सुरुवातीला ३० डिसेंबर रोजी सोने १६० रुपयांनी वधारले. मात्र ३१ डिसेंबर रोजी त्यात ३०० रुपयाची घसरण झाली होती. तर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी किंचित १०० रुपयांनी सोने महागले होते. तर काल २ जानेवारीला त्यात ६०० रुपयांनी वाढ झाली. मागील दोन दिवसात सोने ७०० रुपयांनी वाढले आहे. तर चांदी दरात १००० ते १५०० रुपयापर्यंत वाढ झालीय.

सोने महाग का झाले?
व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंच्या किमतीत झालेली वाढ आणि देशांतर्गत बाजारात गुंतवणूकदारांच्या मागणीमुळे ही वाढ झाली आहे. तज्ज्ञांचे मत आहे की रुपयाच्या कमकुवतपणामुळे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील मजबुतीमुळे सोन्याच्या किमतींना आधार मिळाला आहे. दरम्यान या नवीन वर्षात सोन्याचा भाव ८५ हजार ते ९० हजार रुपयापर्यंत जाणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---