जळगाव लाईव्ह न्यूज । २९ सप्टेंबर २०२३ । भारतात आजपासून पितृपक्षाला सुरुवात झाली असून पुढील काही दिवस बरेच लोक नवीन वस्तू खरेदी करणे टाळतात.या दरम्यान, सराफा बाजारातही फिरकणार नसल्याने मागणी कमी होण्याच्या शक्यतेचा परिणाम पण या दोन्ही धातूंच्या किंमतींवर दिसून येत आहे. दरम्यान, मागील चार दिवसाच्या घसरणीनंतर आज शुक्रवारी सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झालेली दिसून येतेय. Gold Silver Rate Today
आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर दोन्ही धातूंचे दर सुरुवातीपासूनच हिरव्या चिन्हाने व्यवहार करत आहे. MCX आज सकाळी 10.30 वाजेपर्यंत सोने 0.30 टक्क्यांनी म्हणजेच 172 रुपयांनी वाढून 57,300 रुपयांवर व्यवहार करत आहे. तर चांदीचा भाव येथे 1.21 टक्क्यांनी म्हणजेच 851 रुपयांनी वाढून 71,451 रुपये प्रति किलो झाला आहे.
जळगाव सुवर्णनगरीतील दर?
जळगाव सुवर्णनगरीत सध्या 22 कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी 54,800 रुपये प्रति दहा ग्रॅम होता. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी 58,500 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे. दुसरीकडे चांदीचा एक किलोचा दर 72,500 रुपयावर आला आहे.
दरम्यान, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.