जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२४ । जून महिना ग्राहकांना पावला आहे. या महिन्यात सोने आणि चांदीला मोठा विक्रम करता आला नाही. हा महिना उद्या संपले. गेल्या काही दिवसापासून दोन्ही धातूंच्या किमतीत चढउतार सुरूच आहे. दरम्यान, जळगाव सुवर्णनगरीत शुक्रवारी सोन्यासह चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली.
२४ कॅरेट सोन्याचे दर शुक्रवारी ४०० रुपयांनी वाढून विनाजीएसटी ७२३०० रुपयांवर पोहोचले. दुसरीकडे चांदीचे दर गुरुवारच्या तुलनेत किलोमागे एक हजार रुपयांनी वाढून ८९००० रुपयांवर पोहोचले. दरम्यान, आगामी आठवडाभरात कमी-अधिक प्रमाणात सोने-चांदी दर वाढू शकतात.
गेल्या तीन आठवड्यापासून सोन्यात मोठी उसळी दिसली नाही.यापूर्वी मे महिन्यातच २४ कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी ७५००० रुपये प्रति १० ग्रॅमच्या पुढे गेला होता. मात्र उच्चांकीपासून सोन्याच्या दरात जवळपास ३००० रुपयापर्यंतची घसरण झाली आहे.