जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जून २०२३ । सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सोन्यातील दरवाढीला ब्रेक लागला असून सोन्याच्या किमतीत पुन्हा घसरण झाली. मात्र दुसरीकडे चांदीचा दर स्थिर आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सोन्यात आपटी बार सुरु आहे. तुम्हीही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या आजचा सोने आणि चांदीचा दर..
फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्यात सोन्याने नवीन रेकॉर्ड केले होते, मे महिन्याच्या सुरुवातीला वाढ कायम होती. त्यामुळे जून महिन्यात सोने 70 हजारांचा टप्पा ओलांडेल असा दावा करण्यात येत होता. पण मे महिन्यात सोन्याने रिव्हर्स गिअर टाकला. ही घसरण जून महिन्यात पण कायम राहिली. 62,000 रुपयांचा टप्पा गाठणाऱ्या सोने आता 59,000 रुपयांच्या जवळपास खेळत आहे.
जळगावात आज गुरुवारी 29 जून 2023 रोजी सकाळच्या सत्रात 10 ग्रॅम सोने 58,700 रुपये विनाजीएसटी इतक्यावर आला आहे. तर दुसरीकडे एक किलो चांदीचे दरही खाली आले असून आता 70,500 रुपयांना विकले जात आहेत.
पण गेल्या तीन चार दिवसात चांदीत जवळपास 1000 हजार रुपयांहुन अधिकची वाढ झाली. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चांदीचा दर 69400 रुपयांवर होता.
आजचा मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वरील भाव?
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज गुरुवारी सकाळी 10.30 वाजेपर्यंत सोन्याचा 10 ग्रॅम सोन्याचा दर 58,080 रुपयांवर व्यवहार करत आहे. तर चांदीचा एक किलोचा दर 69,075 रुपयावर व्यवहार करत आहे.