⁠ 
सोमवार, जुलै 22, 2024

सोने-चांदी दराची पुन्हा विक्रमी दिशेने वाटचाल ; जाणून घ्या आजचा भाव?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ डिसेंबर २०२३ । सोने-चांदीच्या किंमतींनी मोठी भरारी घेतली असून दोन्ही धातूंचे दर पुन्हा विक्रमाला गवसणी घालण्याच्या अगदी जवळ आहे. दरवाढ झाल्याने लग्नसराईत दागदागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. जळगावच्या सुवर्ण नगरीत सोन्याच्या दराने जीएसटीसह ६६ हजार रुपयाचा टप्पा ओलांडला आहे. गुरुवारी एकच दिवशी सोन्याच्या दरात तब्बल ५०० रुपयाची वाढ झाली. Gold Silver Rate 29 December 2023

डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोन्याचे प्रति तोळ्याचे दर ६६२२९ (जीएसटीसह) या आजवरच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले होते. गुरुवारी सोने दर ५०० रुपयांनी वाढून ६६१२६ वर पोहोचले. ते उच्चांकी दराच्या अवघ्या १०३ रुपये मागे आहे. वर्ष संपण्यास आता अवघे दोन दिवस (वर्किंग) बाकी असताना सोने उच्चांकी दराची पातळी पार करून नवा टप्पा गाठेल याकडे जाणकारांचे लक्ष लागले आहे.

डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच (४ डिसेंबर रोजी) उच्चांकी दराचा टप्पा गाठणारे सोने महिनाभर ६३ ते ६४ हजाराच्या दरम्यान राहिले होते. महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पुन्हा २००-३०० ने चढ-उतार होत होती. तर बुधवारच्या तुलनेत गुरुवारी ५०० रुपयांची वाढ झाली आहे.

यामुळे जीएसटीसह सोन्याचा दर ६६,१२६ रुपये प्रति तोळा इतका आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ५८,८१० रुपये इतका आहे. त्याचप्रमाणे २४ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ६४,२०० रुपयांवर पोहोचला आहे. दुसरीकडे चांदीचा एक किलोचा दर विनाजीएसटी ७६,२०० रुपये इतका आहे.