---Advertisement---
वाणिज्य

जळगावत सोने 200 रुपयांनी तर चांदी 500 रुपयांनी महागली ; असा आहे आजचा भाव..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज | 28 जानेवारी 2024 | नवीन वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात सोन्यासह चांदीच्या दरातील चढ-उतार सामान्य राहिली आहे. या महिन्यात सोने-चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला असून १ जानेवारी पासून आतापर्यंत सोने ९०० ते १००० रुपयांनी तर चांदी २००० रुपयांनी स्वस्त झाली. Gold Silver Rate 28 January 2024

gold silver rate 3

जळगाव सुवर्णनगरीत या आठवड्याभरात सोने दरात प्रति तोळा २०० रुपयांची तर चांदीच्या दरात ५०० रुपयाची वाढ झाली आहे. बजेटपूर्वी सोने-चांदीत नरमाईचे सूर असले तरी बजेटनंतर किंमतीत किती वाढ होते, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

---Advertisement---

जळगावातील सोने-चांदीचा दर:
या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. सोमवारी ६२ हजार ७०० प्रती तोळा (विना जीएसटी) असलेले सोने मंगळवारी व बुधवारी अनुक्रमे ६३ हजार तर गुरुवारी ६२ हजार ८०० रुपये होते. शनिवारी त्यात १०० रुपयांची वाढ होऊन ६२,९०० रुपयांवर न स्थिरावले. आठवड्याच्या पहिल्या दिवशी ७२ हजार रुपये किलो असलेली चांदी गुरुवारी ७३ हजार झाली. शनिवारी ५०० रुपये घटले. सध्या जळगावात २२ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ५७,६२० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. त्याचप्रमाणे २४ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ६२,९०० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. तर चांदीचा दर ७५,५०० रुपये प्रति किलो इतका आहे.

वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---