जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जानेवारी २०२५ । एकीकडे देशभरात लग्नसराईची धामधूम सुरु असून यातच सोन्याच्या किमतीने नवीन उच्चांक गाठला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा पदभार डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतल्यानंतर तसेच त्यांनी केलेल्या घोषणांचा परिणाम देशातील सराफ बाजारावर दिसून आला. दरम्यान आज सोनं आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी काहीसा दिलासा देणारी बातमी आहे.

आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे. देशांतर्गत वायदा बाजारात म्हणजेच MCX वर आज सकाळी 11 वाजेपर्यंत सोने दरात 231 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत घसरण झाली. यामुळे सोने 79,795 रुपयावर व्यवहार करत आहे. दुसरीकडे चांदी दरात 1000 रुपयाची घसरण झाली असून यामुळे MCX वर 90,588 रुपयावर व्यवहार करत आहे.
आज भारतात 22 कॅरेट सोन्याची किंमत 7,554 रुपये प्रति ग्रॅमआणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 8,241 रुपये प्रति ग्रॅम आहे. 26 जानेवारी रोजी भारतात 22 कॅरेट सोन्याची किंमत 7,555 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 8,242 रुपये प्रति ग्रॅम होती. भारतात आज चांदीची किंमत 97.40 रुपये प्रति ग्रॅम आणि 97,400 रुपये प्रति किलोग्राम आहे. भारतात काल चांदीची किंमत 97.50 रुपये प्रति ग्रॅम आणि 97,500 रुपये प्रति किलोग्राम होती