जळगाव लाईव्ह न्यूज । 26 जानेवारी 2024 । तुम्ही जर सोने खरेदीची योजना आखात असाल तर तुमच्यासाठी काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. प्रजासत्ताक दिनी सोन्याने ग्राहकांना दिलासा दिला. तर चांदीच्या किंमतीत वाढ झाली. गेल्या महिन्यात उच्चांक गाठणाऱ्या सोने आणि चांदीला या महिन्यात मोठी झेप घेता आली नाही.
या जानेवारी महिन्यात उच्चांकापासून सोने जवळपास 2200 रुपयांनी तर चांदी 4400 रुपयांनी स्वस्त झाली. बजेटपूर्वी या मौल्यवान धातूत काय अपडेट येते, हे लवकरच समजेल. आजचे दर काय आहे तपासून घ्या…
गुडरिटर्न्सने जारी केलेल्या किमतीनुसार नवीन वर्षाच्या सुरुवातीला, जानेवारी महिन्यात सोन्याच्या दरात घसरण झाली. मध्यंतरी काही दिवस सोन्याच्या किंमती वधारल्या. या महिन्यात सोने 2200 रुपयांनी उतरले. या सोमवारपासून किंमतीत मोठा बदल दिसला नाही. 24 आणि 25 जानेवारी रोजी 50 रुपयांची घसण झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
या महिन्यात चांदीचा भाव घसरला. ग्राहकांना चांदीने दिलासा दिला. या 23 जानेवारी रोजी किंमतीत 500 रुपयांची घसरण आली. तर 24 जानेवारी रोजी किंमतीत 300 रुपयांची वाढ झाली. 25 जानेवारी रोजी चांदीची किंमत 700 रुपयांनी वाढली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 76,000 रुपये आहे.
जळगाव सुवर्णनगरीमधील दर
जळगावमध्ये आता 22 कॅरेट सोने 57,500 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी 62,800 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. यापूर्वी काल सकाळच्या सत्रात 24 कॅरेट सोन्याचा विनाजीएसटी 63100 रुपयावर होता. त्यात एका दिवसात 300 रुपयाची घट दिसून आलीय. तर दुसरीकडे चांदीचा दर 1000 रुपयांनी वाढला आहे. सध्या चांदीचा एक किलो चांदीचा दर विनाजीएसटी 73000 रुपये इतका आहे.