जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑगस्ट २०२२ । सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार सुरु आहे. मागील गेल्या तीन दिवसाच्या घसरणीनंतर गुरुवारी सोन्याच्या भावात वाढ झाली होती. सोबतच चांदीही महागली होती. मात्र आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सकाळच्या सत्रात सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. मात्र दुसरीकडे चांदीच्या भावात आज वाढ दिसून आलीय.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, आज शुक्रवारी सोन्याचा भाव ५० ते ६० रुपयांनी घसरून ५१,६४८ रुपये प्रति १० ग्रॅमच्या पातळीवर आले. तर आज चांदी ११० रुपयांनी वाढली असून चांदीचा एक किलोचा भाव ५५,५५० रुपयांवर गेली आहे. दरम्यान,उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.
जळगावमधील सोने-चांदीचा भाव?
आजच्या घसरणीनंतर जळगावमध्ये सध्या २२ कॅरेट सोन्याचा भाव जवळपास ४८,०५० रुपये इतका आहे. तर २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जवळपास ५२,४५० रुपये इतका आहे. तर चांदीचा भाव ५६,७०० रुपये प्रति किलो इतका आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)
एका दिवसात चार किलो पेक्षा जास्त सोन्याची विक्री :
दरम्यान, गुरुपुष्यामृताच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सराफ बाजार ग्राहकांनी भरला होता. बहुतेक ग्राहकांनी सोन्याची बिस्किटे आणि सोन्याचा तुकडा खरेदीला प्राधान्य दिले. दिवसभरात दागिने, बिस्किटे आणि तुकडा मिळून सुमारे चार किलो पेक्षा जास्त सोन्याची विक्री झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जळगावात गुरुवारी सोन्याचा भाव ५२,५०० रुपये तोळे होता. दरम्यान, गुरुपुष्यामृताचा मुहूर्त साधून महिलांनी कानातील टॉप्स, बांगड्या, अंगठी, गळ्यातील चेन आदी वस्तूंची खरेदी केली. काही ग्राहकांनी सोन्याचे बिस्कीट आणि तुकडा खरेदीस प्राधान्य दिले. एक ग्रॅम वजनापासून ते ग्राहकाच्या मागणीनुसारच्या वजनात हा तुकडा, बिस्कीट उपलब्ध करून देण्यात आले.
सोन्याची शुद्धता कशी तपासावी?
सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.
24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिलेले असते.
22 कॅरेट शुद्ध सोन्यावर 916 लिहिलेले असते.
21 कॅरेट शुद्ध सोन्यावर 875 लिहिलेले असते.