जळगाव लाईव्ह न्यूज । २५ फेब्रुवारी २०२३ । तुम्ही जर सोने आणि चांदी खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. कारण उच्चांक गाठल्यानंतर सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झालीय. शुक्रवारी भारतीय सराफा बाजारात कमकुवत जागतिक ट्रेंडमध्ये सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर काल आठवड्याच्या शेवटच्या व्यापार दिवशी सोने 171 रुपयांनी घसरले आहे. तर दुसरीकडे जळगाव सुवर्णनगरीत सोन्याच्या किमतीत तब्बल 300 रुपयाची घसरण झालीय. यामुळे जळगावात सोन्याचा दर 56 हजाराखाली आले.
तसेच मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर काल चांदीच्या किमतीत तब्बल 900 रुपयाची घसरण झालीय. जळगाव सुवर्णनगरीतही चांदीच्या किमतीत 500 रुपयाची घसरण झालीय. त्यामुळे जळगावात चांदी 66 हजाराखाली आलीय.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वरील सोने-चांदीचा दर?
कालच्या सोन्याच्या किमतीत झालेल्या घसरणीनंतर दहा ग्रॅम सोने 55,416 रुपयांवर आले आहे. तर एक किलो चांदीचा दरही खाली आला असून तो आता 63,450 रुपयांना विकला जात आहे.
जळगाव सुवर्णनगरीतील दर
जळगाव सराफ बाजारात काल सोन्याच्या किमतीत घसरण झालीय. सोने 300 रुपयांनी घसरले असून यामुळे आज सोने 55,900 रुपये प्रति 10ग्रॅमने विकले जात आहे. तर चांदीचा एक किलोचा दर 66000 रुपये इतका आहे. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच सोमवारी सोने दर 56,500 रुपये इतका होता. त्यात आतापर्यंत 600 रुपयाची घसरण दिसून आलीय. मात्र गेल्या पाच दिवसात चांदीच्या किमतीत मोठी घसरण झालीय. सोमवारी 67000 हजार रुपये प्रति किलो असलेली चांदी आज 66000 रुपयापर्यंत घसरली.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)
दरम्यान, MCX वर सर्वकालीन उच्चांकानंतर सोने 3,384 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त झाले. यापूर्वी सोने 2 फेब्रुवारी 2023 रोजी ऑलटाईम हाय होते. यादिवशी सोने 58,800 रुपयांहून अधिकने विकले जात होते.
ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा
तुम्हीही बाजारात सोने खरेदी करणार असाल तर हॉलमार्क पाहूनच सोने खरेदी करा. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्ही सरकारी अॅप देखील वापरू शकता. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे तुम्ही सोन्याची शुद्धता खरी आहे की नकली हे तपासू शकता. याशिवाय तुम्ही या अॅपद्वारे तक्रारही करू शकता.